Find out the new rates for LPG Cooking Gas Cylinders for the month of October
ऑक्टोबर महिन्यासाठी LPG स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे नवे दर आले

ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC) एलपीजी स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत कोणतेही बदल केलेले नाहीत.

नवी दिल्ली, वृत्त संस्था : ऑगस्ट-सप्टेंबरनंतर लागोपाठ तिसर्‍या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये एलपीजी स्वयंपाकाच्या गॅस (lpg gas) सिलेंडरच्या किंमतीत (LPG Gas Cylinder Price 01 October 2020) मोठा दिलासा मिळाला आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC) एलपीजी स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत कोणतेही बदल केलेले नाहीत.

दिल्लीत १४.२ किलोग्रामचा विना अनुदानित एलपीजी सिलेंडरचा दर ५९४ रुपयांवर स्थिर आहे. अन्य शहरांत सुद्धा घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर आहेत. आयओसीच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या किंमतीनुसार, दिल्लीत १९ किलोग्रॅमच्या स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर ३२ रुपयांनी महागला आहे.

जुलै महिन्यात १४ किलोग्रॅमचा स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत ४ रुपयांपर्यंत वाढवण्यात आली होती. तर, जूनच्या दरम्यान दिल्लीत १४.२ किलोग्रॅमचा विना अनुदानित एलपीजी सिलेंडर ११.५० रुपयांनी महागला होता, तर मेमध्ये १६२.५० रुपयांनी स्वस्त झाला होता.