ब्लॅक फंगसचं निदान करणारं पहिलं भारतीय किट पश्चिम बंगालमध्ये तयार, परदेशी किटच्या तुलनेत किंमतही कमी

पश्चिम बंगालमधून(West Bengal) एक दिलासादायक बाब समोर आली आहे. येथील शास्त्रज्ञांनी म्युकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसच्या निदानासाठीचं टेस्टिंग किट(Black Fungus Testing Kit) तयार केलं आहे.

    कोरोनातून(Corona)बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस(mucor micosis) हा आजार होत असल्याने देशासमोर एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मात्र पश्चिम बंगालमधून(West Bengal) एक दिलासादायक बाब समोर आली आहे. येथील शास्त्रज्ञांनी म्युकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसच्या निदानासाठीचं टेस्टिंग किट(Black Fungus Testing Kit) तयार केलं आहे. म्युकरमायकोसिसचे निदान करणारं हे पहिलं भारतीय किट आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार ,DIAGSure म्युकरमायकोसिस डिटेक्शन किट असं या किटचं नाव आहे. ब्लॅक फंगसच्या निदानासाठी सध्या उपलब्ध असलेल्या परदेशी किटची किंमत  ७ ते ८ हजार आहे. पश्चिम बंगालमध्ये तयार करण्यात आलेलं किट नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे बनवलेलं आहे. तसेच परदेशी किट्सच्या तुलनेत स्वस्त असेल अशी माहिती हे किट बनवलेल्या प्रयोगशाळेचे प्रमुख राजा मजुमदार यांनी सांगितले.

    मजुमदार म्हणाले, उच्च दर्जाचे टेस्टिंग किट कमी दरात पुरवणं आमचं ध्येय आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिस आजाराची आरटीपीसआर चाचणी वेगात होईल. अशा प्रकारचं किट तयार करणारी आमची पहिली भारतीय संस्था आहे.सगळीकडे परदेशी किट्सचा वापर केला जातो.या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार देशाच्या अन्न आणि औषध प्रशासनानेही या किटला परवानगी दिली आहे.