brutal murder of the leader and his family

रविवारी सकाळी उशिरापर्यंत घराचे दरवाजे न उघडल्याने शेजारच्यांनी अंगणात डोकावून पाहिले. तेव्हा त्यांना दोघांचे मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते. याबाबत शेजारच्यांनी तात्काळ पोलिसांना कळविले. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. अद्याप हत्या करण्यामागील कारण समोर आलेलं नाही. या प्रकरणात दोन कुटुंबामधील वाद असल्याचे सांगितले जात आहे.

झारखंड : झारखंडच्या सुदामाडीह भागात काल शनिवारी रात्री एका नेत्याच्या (Leader) घरात घुसून त्याच्यासह पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोल आली आहे. नेत्याच्या घरात घुसून कुटुंबीयांची हत्या (Killed) केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री जेएमएम नेता शंकर रवानी आणि कुटुंबीयावर पत्नीवर आधी गोळी चालवण्यात आली. त्यानंतर अंगणात आणून त्यांचा गळा कापण्यात आला. (brutal murder of the leader and his family)

रविवारी सकाळी उशिरापर्यंत घराचे दरवाजे न उघडल्याने शेजारच्यांनी अंगणात डोकावून पाहिले. तेव्हा त्यांना दोघांचे मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते. याबाबत शेजारच्यांनी तात्काळ पोलिसांना कळविले. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. अद्याप हत्या करण्यामागील कारण समोर आलेलं नाही. या प्रकरणात दोन कुटुंबामधील वाद असल्याचे सांगितले जात आहे.

मयत शंकर रवानी हे जेएमएस धनबाद महानगरचे उपाध्यक्ष होते. धनबाद एसएसपी असीम विक्रांत मिंच यांनी सांगितले की, जेएमएम नेता शंकर रवानी आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. त्यांच्या मृतदेहावर गोळी आणि चाकूचे निशाण आहेत. तसेच ही घटना रात्री घडल्याची त्यांच्य शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

शंकर रवानी आणि त्यांची पत्नी बालिका देवी यांचा एक पूत्र आहे, जो दुसरीकडे असतो. आणखी एका मुलाची तीन वर्षांपूर्वी हत्या झाली आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री ४ ते ५ जण त्यांच्या घरात घुसले आणि दाम्प्त्याला गोळी घातली, यानंतर त्यांना खेचत अंगणात आणलं आणि धारदार शस्त्राने गळा कापला.