ती वर्षभर मैत्रिणीच्या घरी जात होती आणि मैत्रिणीचंच आयुष्य उद्धस्त करून घेत होती

निशातपुरा येथील करोंद भागात राहणारी ३० वर्षीय महिला हाऊस वाइफ आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितलं की, महिलेने मैत्रीण आणि तिच्या भावाविरोधात बलात्कार आणि धमकी देण्याचा आरोप केला आहे. महिलेने सांगितलं की, तिची मैत्रीण पिंकी नेहमी घरी येत-जात होती.

  भोपाळ : भोपाळमधून (Bhopal) एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथील एका महिलेसोबत तिच्या मैत्रिणीचा मोठा भाऊ एक वर्षापर्यंत बलात्कार करीत होता. महिलेने जेव्हा मैत्रिणीला याबाबत सांगितलं तर तिनेच उलट महिलेला धमकी दिली. भावाविरुद्ध कोणाला सांगितलं तर तुला बदनाम करेन अशी धमकी दिली. यानंतर ती महिलेला जबरदस्ती इंदूर येथे घेऊन गेली. येथे पुन्हा मैत्रिणीच्या भावाने कोल्ड ड्रिंक्समध्ये नशेचं औषध टाकून तिला प्यायला दिलं आणि बलात्कार केला.

  मात्र वारंवार हा प्रकार घडत असल्यामुळे शेवटी महिलेने याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. आता महिलेची मैत्रीण आणि तिच्या भावाविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे.

  निशातपुरा येथील करोंद भागात राहणारी ३० वर्षीय महिला हाऊस वाइफ आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितलं की, महिलेने मैत्रीण आणि तिच्या भावाविरोधात बलात्कार आणि धमकी देण्याचा आरोप केला आहे. महिलेने सांगितलं की, तिची मैत्रीण पिंकी नेहमी घरी येत-जात होती. यादरम्यान पिंकीने तिचा भाऊ लोकेश रघुवंशी यांच्याशी ओळख करून दिली.

  लोकेश हा इंदूर येथे राहतो, मध्ये मध्ये तो भोपाळला येत असतो. यादरम्यान लोकेश महिलेच्या घरी येऊ लागला होता. ७ जून २०२० रोजी दुपारी ती घरी एकटी होती. यादरम्यान लोकेश घरी पोहोचला आणि दरवाजा आतून बंद केला. धमकी देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. बदनामीच्या भीतीने ती गप्प राहिली. दुसऱ्या दिवशी तिने पिंकीला याबाबत सांगितलं तर पिंकीने भावाची साथ दिली. यावर ती म्हणाली की, भावाने बरोबरच केलं. तो तुझ्यावर प्रेम करू लागला आहे. जर कोणाला याबाबत सांगितलं तर तुझी बदनामी करीन.

  त्यानंतर जेव्हा जेव्हा लोकेश भोपाळ येत असे तो महिलेवर बलात्कार करत होता. पिंकी भावाला रोखण्याऐवजी त्याला साथ देत होती. महिलेने आरोप केला आहे की, गेल्या १० जुलै रोजी पिंकी काही कारण सांगून तिला इंदूर घेऊन गेली. पिंकी तिला थेट लोकेशकडे घेऊन गेली. येथे लोकेशने कोल्ड ड्रिक्समध्ये नशेचं औषध देऊन महिलेवर पुन्हा बलात्कार केला. विरोध केल्यानंतर लोकेश तिला इंदूरला सोडून पळून गेला. महिला कशीबशी भोपाळला पोहोचली आणि रात्री १० वाजता FIR दाखल केला.

  for a year the woman was raped by her friends older brother