cowin app

सीकरण मोहिमेमध्ये लस घेण्यासाठी कोविन पोर्टलच्या(cowin portal) माध्यमातून २ दिवसांमध्ये २ कोटी २८ लाख भारतीयांनी(Indian registered on Cowin portal) नोंदणी केली असल्याची माहिती मिळाली आहे.

  कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा (third phase of corona vaccination)१ मे पासून सुरु होत आहे. या लसीकरण मोहिमेमध्ये लस घेण्यासाठी कोविन पोर्टलच्या माध्यमातून २ दिवसांमध्ये २ कोटी २८ लाख भारतीयांनी(Indian registered on Cowin portal) नोंदणी केली असल्याची माहिती मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

  देशभरात एकूण १५ कोटी २१ लाख लोकांचे लसीकरण पूर्ण झाल्याचेही मंत्रालयाने सांगितलं आहे. २८ एप्रिल रोजी दुपारी चार वाजल्यापासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. केवळ ५३ तास ३० मिनिटांमध्ये २ कोटी २८ लाखांहून अधिक जणांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.

  तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी कोविन पोर्टलवरुन २ कोटी २८ लाख लोकांनी दोन दिवसात नोंदणी केली आहे. काल रात्री साडेनऊ वाजेपर्यंतच्या माहितीनुसार २ कोटी २८ लाख ९९ हजार १५७ जणांनी कोरोना लसीकरणासाठी कोविन पोर्टलवरुन नोंदणी केली असल्याचे मंत्रालयाच्या पत्रकावरून समजते.

  रात्री आठ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार १५ कोटी २१ लाख पाच हजार ५६३ जणांचे लसीकरण पूर्ण करण्यात आल्याचा उल्लेख या पत्रकात आहे. यापैकी ९३ लाख ८३ हजार ६७६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ६१ लाख ८९ हजार ६३५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्याचप्रमाणे पहिल्या फळीत काम करणाऱ्या १ कोटी २४ लाख १२ हजार ९०४ कोरोनायोद्ध्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.

  लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या पहिल्या फळीतील कोरोनायोद्धांची संख्या ६७ लाख चार हजार १९३ इतकी आहे. ४५ ते ६० वयोगटातील ५ कोटी १७ लाख २३ हजार ६०७ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच याच वयोगटातील ३४ लाख २ हजार ४९ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. ६० वर्षांहून अधिक वय असणाऱ्या ५ कोटी १८ लाख ७२ हजार ५०३ जणांनी लसीचा पहिला तर १ कोटी ४ लाख १४ हजार ९९६ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, असं या पत्रकात म्हटलं आहे.

  गुरुवारी दिवसभरामध्ये २० लाख ८४ हजार ९३१ जणांचे देशात लसीकरण करण्यात आलं. गेल्या १४० दिवसांपासून लसीकरण सुरु आहे.