विजय रुपाणींच्या जागी कोणाची वर्णी लागणार? भाजप विधिमंडळ पक्षाची आज होणार बैठक

विजय रुपाणी (Chief Minister Vijay Rupani) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा (Resigned) दिल्यानंतर आता गुजरात मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत निर्णय आज घेण्यात येणार आहे. विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी गुजरात भाजप विधिमंडळ पक्षाची (Gujarat BJP Legislative Party) रविवारी बैठक (meeting) होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

  अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणूक (Gujarat Assembly Election) अवघ्या एका वर्षावर आली असतानाच, राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी (Chief Minister Vijay Rupani) यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा (Resigned) दिला. पक्षाने गुजरातच्या व्यापक हितासाठी घेतलेल्या निर्णयामुळे मी स्वेच्छेने राजीनामा दिला आहे, असे रुपाणी यांनी स्पष्ट केले आहे. गुजरातमध्ये पडद्यामागे नेतृत्व बदलण्याची तयारी सुरू होती,पण भाजप विजय रुपाणी यांना इतक्या लवकर मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याचा निर्णय घेईल याची कल्पना कोणालाही नव्हती.

  विजय रुपाणी (Chief Minister Vijay Rupani) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा (Resigned) दिल्यानंतर आता गुजरात मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत निर्णय आज घेण्यात येणार आहे. विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी गुजरात भाजप विधिमंडळ पक्षाची (Gujarat BJP Legislative Party) रविवारी बैठक (meeting) होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अहमदाबाद येथे वर्ल्ड पाटीदार सोसायटीच्या सरदार धामचे उद्घाटन केले तेव्हा गुजरातच्या राजकारणात मोठा बदल घडेल याची कोणालाही कल्पना नव्हती. भाजपाचे संघटन मंत्री बी एल संतोष गांधीनगर येथे आल्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील आणि राज्य प्रभारी रत्नाकर यांची भेट घेतली. थोड्याच वेळात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे राज्यपालांना भेटायला गेल्याची माहिती समोर आली. त्यानंतर विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

  विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी गुजरात भाजप विधिमंडळ पक्षाची रविवारी बैठक होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते यमल व्यास यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय निरीक्षकांसह विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहू शकतात. काही केंद्रीय मंत्री गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सहभागी असल्याचेही म्हटले जात आहे.

  नरेंद्र तोमर भाजपाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी गुजरातला भेट देणार आहेत. भाजपाचे सर्व आमदार केंद्रीय निरीक्षकांसह बैठकीला उपस्थित राहतील. याआधी बी एल संतोष यांनी पक्षाचे राज्य प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, मंत्री भूपेंद्र सिंह चुडासामा आणि प्रदीपसिंह जडेजा, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप सिंह वाघेला आणि राजूभाई पटेल आणि विधानसभेतील पक्षाचे मुख्य व्हीप पंकज देसाई यांची भेट घेतली होती. नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाचा निर्णय बैठकीत घेतला जाईल.

  विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. उपमुख्यमंत्री असलेल्या नितीन पटेल यांचेही नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया आणि यांच्याही नावाची चर्चा सुरु असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय गोरधन जडाफिया आणि प्रफुल्ल पटेल हेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.