‘त्या’ चर्चेबाबत माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंनी दिलं उत्तर ; म्हणाले माझी महत्वाकांक्षा…

आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते तरूण गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश व राज्यसभा खासदार रंजन गोगोई हे पुढील वर्षी होणाऱ्या आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असू शकतात, असं मोठं विधान केले होते. त्यांनतर रंजन गोगई यांच्याबाबत राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र आता याबाबत खुद्द रंजन गोगई यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. मी राजकारणी नसून माझी तशी महत्वाकांक्षा किंवा उद्देश नसल्याचे त्यांनी एका माध्यमातील प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले आहे.

आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते तरूण गोगोई शनिवार २२ ऑगस्ट रोजी म्हणाले होते की. पुढील वर्षी होणाऱ्या आसाम मधील विधनासभा निवडणुकीसाठी रंजन गोगोई हे भाजपाचे आसमाच्या मुख्यमंत्रीपदासाठीचे उमेदवार असू शकतात. त्यांनतर रंजन गोगई यांनी स्वतःहून ही शक्यता फेटाळून लावली आहे. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत.त्यांनी न्यायाधीश म्हणून केलेल्या वर्तनाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने नुकतीच फेटाळली आहे.