कोरोना लसीचा डोस घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांना कोरोनाची लागण

माझे वडिल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत, त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे, जोपर्यंत आम्ही कोरोना चाचणी करत नाहीत, तोपर्यंत आम्ही कुटुंबातील इतरही सर्वच सदस्य होम आयसोलेशनमध्ये राहणार आहोत. तसेच, गेल्या काही दिवसांत आमच्याशी संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटच्या माध्यमातून केलं आहे.

    श्रीनगर : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारुक अब्दुल्ला यांना कोरोना लसीचा डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे, फारुक अब्दुल्ला यांचे सुपुत्र ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. तसेच, जोपर्यंत कुटुंबातील सर्वांची कोरोना चाचणी होत नाही, तोपर्यंत आमच्या कुटुंबातील सर्वच सदस्या विलगीकरणात राहतील, असेही ओमर यांनी स्पष्ट केले. अब्दुल्ला यांनी याच महिन्यात कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतला होता.

     

    ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करुन म्हटले, माझे वडिल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत, त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे, जोपर्यंत आम्ही कोरोना चाचणी करत नाहीत, तोपर्यंत आम्ही कुटुंबातील इतरही सर्वच सदस्य होम आयसोलेशनमध्ये राहणार आहोत. तसेच, गेल्या काही दिवसांत आमच्याशी संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटच्या माध्यमातून केलं आहे.