CBI संचालकपदासाठी महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक सुबोध जयस्वालांचे नाव चर्चेत

IPS अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल यांचं नाव संचालकपदासाठी आघाडीवर आहे. विशेष म्हणजे सुबोध कुमार जयस्वाल हे महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक आहेत. दत्ता पडसलगीकर यांच्या निवृत्तीनंतर जयस्वाल हे २८ फेब्रुवारी २०१९ ला महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक झाले होते. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविका आघाडी सरकारशी सुबोध कुमार जयस्वाल यांची पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीवरून मतभेद निर्माण झाले होते.

    नवी दिल्लीः CBI च्या नव्या संचालकपदासाठी यादी जाहीर करण्यात आली असून त्यात महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक सुबोध जयस्वालांचे नाव चर्चेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली समोवारी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत काही अधिकाऱ्यांच्या नावांवर चर्चा करण्यात आली. या पॅनलमध्ये सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना आणि लोकसभेतील विरोधी पक्षातील नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश आहे.

    सीबीआयचे संचालक पद हे फेब्रुवारीपासून रिक्त आहेत. त्यामुळे नवीन संचालकपदासाठी उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक एच. सी. अवस्थी, सशस्त्र सुरक्षा दलाचे महासंचालक कुमार राजेश चंद्रा आणि गृह मंत्रालयाचे विशेष सचिव व्ही. एस. के. कौमुदी यांचा यापैकी एक सीबीआयचे नवे संचालक होतील, असं सूत्रांकडून सांगण्यात येतंय.अतिरिक्त संचालक प्रवीण सिन्हा ३ फेब्रुवारीपासून सीबीआयचे अंतरिम प्रमुख आहेत. विशेष म्हणजे सीबीआय संचालकपदासाठी १९८५ बॅचचे IPS अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल यांच्या नावाचीही चर्चा झाली. त्यांचे नाव सीबीआय संचालकपदासाठी आघडीवर असल्याचं असं सूत्रांनी सांगितलं. CBI संचालकपदासाठी सरकारकडून कधीही नाव जाहीर होऊ शकते, असं वृत्त IANS ने दिलं आहे.

    सुबोध कुमार जयस्वाल यांचे नाव आघाडीवर

    IPS अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल यांचं नाव संचालकपदासाठी आघाडीवर आहे. विशेष म्हणजे सुबोध कुमार जयस्वाल हे महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक आहेत. दत्ता पडसलगीकर यांच्या निवृत्तीनंतर जयस्वाल हे २८ फेब्रुवारी २०१९ ला महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक झाले होते. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविका आघाडी सरकारशी सुबोध कुमार जयस्वाल यांची पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीवरून मतभेद निर्माण झाले होते. यादरम्यान केंद्र सरकारने सुबोध कुमार जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) महासंचालकपदी नियुक्ती केली.