माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली असून सध्या त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर आर्मी रुग्णलयात उपचार सुरु आहेत अशी माहिती पीटीआयने ट्विटरवर दिली आहे. मुखर्जी यांची आज कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. याबाबतची माहिती मुखर्जी यांनी स्वतः ट्विट करत दिली  होती.सध्या त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. आता मिळालेल्या माहितीनुसार  त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं आहे .