hathras

दिल्लीहून हाथरसला निघालेल्या एका संघटनेच्या चार जणांना पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे. उ. प्रदेशात अशांतता निर्माण करण्याच्या कटात हे चारही जण सामील असल्याचा पोलिसांचा संशय आहे. हाथरस प्रकरणाच्या निमित्ताने उ. प्रदेशात जातीय दंगली घडविण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

लखनऊ : उत्तर प्रदेशातील प्रदेशातील हाथरस येथे दलित तरुणीवर झालेल्या अत्याचार (Hathras Gang Rape) प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटत आहेत. आता यावरुन राजकारणही तापले आहे. गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडी लक्षात घेता पोलिसांनी राज्य सरकारची प्रतिमा मलिन (tarnishing the image of the government) करण्याचा प्रयत्न आणि जातीय तेढ (conspiracy ) निर्माण करण्याच्या षडयंत्राच्या आरोपाखाली अज्ञात व्यक्तींविरोधात चांदपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चार जणांना अटकही करण्यात आली आहे. हाथरस प्रकरणी उ. प्रदेशात एकूण २१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दिल्लीहून हाथरसला निघालेल्या एका संघटनेच्या चार जणांना पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे. उ. प्रदेशात अशांतता निर्माण करण्याच्या कटात हे चारही जण सामील असल्याचा पोलिसांचा संशय आहे. हाथरस प्रकरणाच्या निमित्ताने उ. प्रदेशात जातीय दंगली घडविण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi) यांनी केला आहे. ‘देशात आणि राज्यात जातीय (communal strife) आणि धार्मिक दंगली घडविण्याचा कट रचण्यात येतो आहे. यासाठी परदेशातून फंडिंग होत आहे’ असा आरोपही योगींनी केला आहे.

सोमवारी काही संशयित हे दिल्लीहून हाथरसकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर तपासणीला सुरुवात करण्यात आली, स्विफ्ट डिझायरमधून येत असलेल्या चार तरुणांची चौकशी केली असता, चारही तरुण हे पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया आणि त्याची सहयोगी संस्था कँपस फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित असल्याचे समोर आले. सिद्दीकी, मसूद अहमद आणि आलम अशी यातील तिघांची नावे आहेत. या चोघांकडून मोबाईल, लॅपटॉप आणि प्रतिकूल प्रभाव निर्माण करणारे साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

राज्यभरात पोस्टर आणि सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून राज्यातील वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी पोलिसांची तपास यंत्रणा शोध घेत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट टाकल्याप्रकरणी राज्यात १३ ठिकाणी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.