बिहारमध्ये होणार कोरोनाचे मोफत लसीकरण; जाणून घ्या इतर ठिकाणी काय असेल किंमत!

कोरोना व्हायरसच्या संकटाला आता वर्षभराचा काळ लोटला आहे. या काळात अनेक कंपन्यांनी आपली लस प्रभावी असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता अमेरिकन कंपनी मॉडर्नाने नवीन दावा केला आहे. या कंपनीने केलेल्या दाव्यानुसार ही लस लक्षणे न दिसणाऱ्या कोरोना रुग्णांवर देखील प्रभावी ठरणार आहे.

  • बिहार मंत्रिमंडळाचा निर्णय

पाटणा. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १५ महत्त्वपूर्ण निर्णयांना मान्यता देण्यात आली. या बैठकीत बिहार सरकारकडून राज्यातील जनतेला कोरोना विषाणूची लस विनाशुल्क दिली जाणार असल्याच्या निर्णयावरही शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच, बैठकीदरम्यान नितीश सरकारच्या पुढील पंचवार्षिक कार्यक्रमाच्या योजनेस मान्यता देण्यात आली. या बैठकीत रालोआने निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासंदर्भात मंजूरी देण्यात आली.

मंत्रिमंडळाच्या या बैठकीत मोफत कोरोना लस, शिक्षण आणि तरूणांचे रोजगार, पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन रक्कम, जन्मत: हृदयात छिद्र असलेल्या लहान मुलांवर विनामूल्य उपचार यांसारखे महत्वाचे निर्णय घेण्यात आले. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर हे स्पष्ट झाले आहे की, बिहारमधील सामान्य लोकांना विनामूल्य कोरोनाची लस दिली जाणार आहे. आता लवकरच संबंधित विभागातून त्यासंबंधीत अधिसूचना जारी करण्यात येईल.

प्रभावी लसीकडे जगाच्या नजरा

जगभरातील सर्वच लोक कोरोना विषाणुवरील प्रभावी लसीकडे डोळे लावून बसले आहेत. अनेक देशांमध्ये कोरोनाच्या लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. अशातच सर्व देशांचे लक्ष भारताकडे लागले आहे. भारतात पुढील काही दिवसांतच कोरोना व्हॅक्सीनच्या आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली जाऊ शकते. भारतीय ड्रग्ज कंट्रोलरच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, कमीत कमी तीन व्हॅक्सीन आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यासाठी विचारात घेतल्या जात आहेत. पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट आणि हैदराबादची औषध कंपनी भारत बायोएनटेकने याआधीच ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे.

देशात ८ लसींवर क्लिनिकल ट्रायल

भारतात कोविड-19 वॅक्सिनच्या ट्रायलसंदर्भात सांगताना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, भारतामध्ये ८ कोरोना वॅक्सिन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहेत. एक कोविशिल्ड आहे, जी एस्ट्रेजेनिकाच्या सहयोगाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तयार करत आहे. या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांतील चाचणी सध्या सुरु आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या वतीने केंद्र सरकारकडे लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागण्यात आली आहे.

लक्षण नसणाऱ्यांवरही प्रभावी ठरणार ‘ही’ लस

कोरोना व्हायरसच्या संकटाला आता वर्षभराचा काळ लोटला आहे. या काळात अनेक कंपन्यांनी आपली लस प्रभावी असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता अमेरिकन कंपनी मॉडर्नाने नवीन दावा केला आहे. या कंपनीने केलेल्या दाव्यानुसार ही लस लक्षणे न दिसणाऱ्या कोरोना रुग्णांवर देखील प्रभावी ठरणार आहे. त्याचबरोबर या लसीचा एक डोस या रुग्णांना पुरेसा ठरणार असून एका लसीमध्येच त्यांना फायदा मिळणार आहे.
पहिल्या डोसनंतर लगेच दिसणार प्रभाव

कंपनीने यासंदर्भात निरीक्षणांना सुरुवात केली असून, लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांना या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर लगेच याचा प्रभाव दिसू लागणार आहे. याबाबत संपूर्ण विश्लेषण झाले नसून यावर अजूनही काम सुरु असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्याचबरोबर कंपनीने असे म्हटले आहे की, ट्रायलमध्ये सामील होणाऱ्या ३८ लक्षणे नसणारे लोक दुसऱ्या डोस दरम्यान देखील पॉझिटिव्ह आढळून आले होते. अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीने लसीची किंमत जाहीर केली आहे. मॉडर्ना कंपनीने सांगितले आहे की, सरकारकडून एका डोससाठी कंपनी २५ डॉलर (१ हजार ८५४ रुपये) पासून ३७ डॉलर (२ हजार ७४४ रुपये) घेईल. तसेच किती प्रमाणात लसीची ऑर्डर दिली जाईल, त्याप्रमाणे किंमत ठरवली जाईल.

अशी सुरु आहे लसीच्या साठवणीची तयारी
देशाच्या आरोग्य मंत्रालयाकडून अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आली. ज्याअंतर्गत मोठ्या स्तरावर कोरोना लसीकरणापूर्वी या लसीच्या साठवणीसाठी कशी तयारी करण्यात आली हे, याची माहिती देण्यात आली. यानुसार, देशात सध्याच्या घडीला कोविड 19 वरील लसीच्या साठवणीसाठी २९००० कोल्ड चेन पॉईंट्स, २४० वॉक इन कूलर, ७० वॉक इन फ्रिजर, ४५००० आईस लाईन रेफ्रिजरेटर, ४१००० डीप फ्रिजर आणि ३०० सोलार रेफ्रिजरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना लसीच्या साठवणीसाठी वरीलपैकी बरीच सामग्री राज्यांना देण्यात आली आहे. तर, उर्वरित सामग्री देण्याचे काम सुरु असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

देशभरात होणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या व्यक्ती आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीरेही घेण्यात आली आहेत. मेडिकल ऑफिसर, वॅक्सिनेटर ऑफिसर, अल्टरनेटीव्ह ऑफिसर, कोल्ड चेन हॅन्डलर, सुपरवायझर, डेटा मॅनेजर, आशा सेविका यांना प्रत्यक्ष आणि डिजिटल स्वरुपातून यासंदर्भातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. काही ठिकाणी ही सत्र अद्यापही सुरु आहेत.