groom video image

एक नवरदेवाचा व्हिडिओ(Groom Viral Video) खूप व्हायरल झाला आहे.

    लग्नामध्ये नेहमीच नातेवाईकांची आणि मित्रांची वर्दळ पाहायला मिळते. नवऱ्या मुलाचा रुबाब तर वेगळाच असतो. मात्र काहीवेळा असा प्रसंग समोर येतो ज्यामुळे याच नवरदेवाची चांगलीच फजिती होते. सध्या असाच एक नवरदेवाचा व्हिडिओ(Groom Viral Video) खूप व्हायरल झाला आहे.

    हा व्हिडिओ एका लग्न समारंभातील आहे. या कार्यक्रमात नवऱ्या मुलासमोर मिठाई ठेवलेली आहे. अचानकपणे नवरदेवाचे मित्र त्याच्याजवळ आले आहेत. यावेळी जवळ येऊन हे मित्र त्याला शुभेच्छा देत आहेत. मात्र, यावेळी अचानकपणे नवरदेवाचे काही मित्र त्याचा ड्रेस फाडायला लागले(Friends tore groom`s Dress) आहेत. नवरदेवाचे चार-चार मित्र एकाच वेळी त्याचा ड्रेस फाडण्यात गुंतलेले आहेत. दोन ते तीन मित्र ड्रेस फाडत असल्यामुळे नवरदेवाचा ड्रेस काही वेळानंतर पूर्णपणे फाटलेला दिसत आहे.

    हे सगळं घडत असताना नवरदेवसुद्धा काही म्हणत नाहीये.दरम्यान हा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भर मंडपात नवऱ्या मुलाची त्याच्या मित्रांमुळे झालेली फजिती पाहण्यासारखी आहे. या व्हिडीओला पाहून मित्र हे खूपच खट्याळ असतात, असे अनेक नेटकरी म्हणत आहेत.  ‘official_niranjanm87’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.