१ एप्रिलपासून Income Taxबाबतच्या नियमांमध्ये बदल, अधिक माहिती जाणून घ्या

तुम्ही वेळेत आयकर भरला(Income Tax return) नाही तर आयकर विभाग(income tax rule) तुम्हाला नोटीसही पाठवू शकतो. तुमचं उत्पन्न कर भरण्यायोग्य आहे हे त्याला कळालं तर अशी नोटीस पाठवली जाऊ शकते. अशा प्रकरणात तुम्हाला उशीर झालेल्या कालावधीसाठी एकूण कर रकमेसोबतच लागू झालेलं व्याजही दंड म्हणून भरावं लागू शकतं.

    नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं आर्थिक वर्ष २०१९-२०२० चा आयटीआर भरण्याची मुदत वाढवली गेली होती. आता पुन्हा एकदा केंद्र सरकारनं वित्त विधेयक – २०२१नुसार  नियमात बदल केला आहे. (income tax 2021)

    नव्या नियमानुसार, तुम्ही उशीरा आयकर भरला तर १ एप्रिल २०२१ पासून  विलंब शुल्क आकारलं जाणार आहे. सध्याच्या नियमानुसार, करदात्याला मुल्यांकन वर्षाचा परतावा मार्चपर्यंत भरण्याची मुभा होती. तेच यानंतर डिसेेंबरनंतर भरल्यावर ५००० रुपयांचं शुल्क आणि मार्चच्या शेवटपर्यंत १००० रुपयांचं शुल्क द्यावं लागत होतं.

    मात्र आता ही सवलत संपुष्टात येणार आहे. मागच्या वर्षीचा परतावा भरण्याची सुविधा आता मार्चपर्यंत असणार नाही. ही सुविधा डिसेंबरलाच संपून जाणार आहे. या कालमर्यादेसाठी शुल्क ५००० रुपयेच असणार आहे. मात्र तुमचं उत्पादन पाच लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला हजार रुपयेच शुल्क द्यावं लागेल.

    तुम्ही वेळेत आयकर भरला नाही तर आयकर विभाग तुम्हाला नोटीसही पाठवू शकतो. तुमचं उत्पन्न कर भरण्यायोग्य आहे हे त्याला कळालं तर अशी नोटीस पाठवली जाऊ शकते. अशा प्रकरणात तुम्हाला उशीर झालेल्या कालावधीसाठी एकूण कर रकमेसोबतच लागू झालेलं व्याजही दंड म्हणून भरावं लागू शकतं. अशावेळी एखाद्या करदात्याकडे करायोग्य उत्पन्न आहे मात्र तरीही तो कर भारत नसल्यास संकट उभं राहू शकतं. (1 April new rules for income tax)

    आजवर करदाते कर वाचवण्यासाठी काही माहिती उघड करत नव्हते. आता आयकर विभागाचे अधिकारी थेट तुमचं ब्रोकरेज हाऊस, एएमसी किंवा पोस्ट ऑफिसकडून याबाबत माहिती घेतील. त्यामुळं आता आकारदात्याला आपल्या उत्पन्नाचे स्रोत आणि गुंतवणुकीबाबतची माहिती लपवणं अवघड होणार आहे.