गांधी कुटुंबीय होणार हद्दपार; स्मृती इराणींचे भाकित

माजी काँग्रेस अध्यक्षांवर त्यांनी शेतकऱ्यांची जमीन हडपणे आणि त्यांचा अधिकार हिरावून घेतल्याचाही आरोप केला. सोन्याच्या महालात राहणाऱ्यांना शेतकऱ्यांचे दु:ख कसे कळणार असा टोमणाही त्यांनी हाणला.

अमेठी. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रायबरेलीतूनही गांधी कुटुंबीय हद्दपार होईल, असे भाकित केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले.  आपल्या मतदारसंघात तीन दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या स्मृती इराणी यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्यासोबत नवोदय विद्यालय गौरीगंज येथे ७९.५९ कोटींच्या ६७ प्रकल्पांचे भूमिपूजन केले.  राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीगाळ करतात आणि देशात संभ्रम पसरवितात व दिशाभूल करतात असा आरोपही त्यांनी केला. माजी काँग्रेस अध्यक्षांवर त्यांनी शेतकऱ्यांची जमीन हडपणे आणि त्यांचा अधिकार हिरावून घेतल्याचाही आरोप केला. सोन्याच्या महालात राहणाऱ्यांना शेतकऱ्यांचे दु:ख कसे कळणार असा टोमणाही त्यांनी हाणला. उल्लेखनीय असे की रायबरेली लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी प्रतिनिधित्व करतात.

काँग्रेसने गरीबांचे नुकसानच केले
गांधी कुटुंबीयाविरोधात एका सामान्य घरातील महिलेसाठी लढा देणे सोपो नव्हते. मी तर बराच अपमान सकहन केला आणि शिवीगाळही सहन केली आहे. परंतु जनतेच्या प्रेमामुळेच आज येथील खासदार झाले. गांधी कुटुंबीय आणि राहुल गांधी यांनी त्यांचे राजकारण सुरू ठेवण्यासाठी हेतुपुरस्सर शेतकरी तसेच गरिबांना अधिकच गरीबीच्या खाईत लोटण्याचे काम केले, असा आरोप केला.  ज्यांनी कधीच गरीबी पाहिली नाही त्यांना गरीबांचे दु:ख काय समजणार. त्यांना तर  मोसमी पिकांची नावेही माहित नाही, अश शब्दात स्मृती इराणी यांनी गांधी कुटुंबीयांवर हल्लाबोल केला.