राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे संयोजक आणि नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल (राजस्थान)
राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे संयोजक आणि नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल (राजस्थान)

आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे संयोजक आणि नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यात छुपी आघाडी असल्याला आरोप करीत दोघांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी केली आहे. बेनीवाल यांनी शुक्रवारी एकापाठोपाठ एक ट्विट करत गहलोत आणि वसुंधरा राजेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला.

जयपूर (Jaipur).  आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे संयोजक आणि नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यात छुपी आघाडी असल्याला आरोप करीत दोघांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी केली आहे. बेनीवाल यांनी शुक्रवारी एकापाठोपाठ एक ट्विट करत गहलोत आणि वसुंधरा राजेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला.

दोन्ही नेते एकमेकांच्या भ्रष्टाचारावर पडदा टाकत आहे आणि या छुप्या आघाडीमुळे गेल्या 22 वर्षांपासून जनतेचे मोठे नुकसान झाले आहे, असा आरोप बेनीवाल यांनी केला. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी या दोघांची नार्को टेस्ट करावी, असी मागणी त्यांनी केली आहे. उल्लेखनीय आहे की, रालोआत असूनही बेनीवाल वसुंधरा राजेंना विरोध करीत आले आहे. गहलोत सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि वसुंधरा राजे यांच्यात छुपी आघाडी असल्याचा नवा आरोप केला आहे. बेनीवाल यांनी ट्विटच्या माध्यमातून दोघांमधील आघाडीचे सत्य जनतेसमोर यावे, असे म्हटले आहे.

वसुंधरांच्या मौनावर प्रश्नचिन्ह
हनुमान बेनीवाल यांनी आपल्या ट्विट्सच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या मौनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्यात गुन्हेगारी शिगेला पोहोचली आहे आणि महिलांवरील अत्याचारामुळे राजस्थानची मान शरमेने खाली झुकली आहे. मात्र, अजूनही वसुंधरा राजे यांनी याबाबत काहीही वक्तव्य केलेले नाही. काँग्रेसकडून जेव्हा-जेव्हा भाजपावर आरोप केले जातात, तेव्हा वसुंधरा राजे नेहमीच गप्प असतात. यामुळे राजे यांची गहलोतांसोबत छुपी आघाडी असल्याचे दिसून येते, असे बेनीवाल यांनी म्हटले आहे.