मुली स्वतःहून संबंध ठेवतात अन् ‘ब्रेकअप’नंतर बलात्काराच्या तक्रारी करतात; महिला आयोगाच्या अध्यक्षांचं विधान

नवी दिल्ली : भारतात महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच महिला आयोगाच्या अध्यक्षांनी धक्कादायक विधान केले आहे." बहुतांश मुली या स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर पुरुषांवर बलात्कार केल्याचा आरोप करतात, असं विधान छत्तीसगड राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केलं आहे.या वक्तव्यानंतर वादंग उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली : भारतात महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच महिला आयोगाच्या अध्यक्षांनी धक्कादायक विधान केले आहे.” बहुतांश मुली या स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर पुरुषांवर बलात्कार केल्याचा आरोप करतात, असं विधान छत्तीसगड राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केलं आहे.या वक्तव्यानंतर वादंग उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये महिलांवरील अत्याचाराबाबत माध्यमांशी संवाद साधत असताना त्या बोलत होत्या. जर एखादी विवाहित पुरुष एखाद्या मुलीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवत असेल तर अशावेळी मुलींनी हे बघायला हवं की ती व्यक्ती त्यांना जगण्यासाठी मदत करणार आहे की नाही. मात्र जेव्हा त्यांचे असे हे संबंध तुटतात तेव्हा बहुतांश घटनांमध्ये महिला पोलीस ठाण्यात धाव घेतात असं नायक यांनी म्हटलं आहे. लिव्ह इन रिलेशनशिप संपते तेव्हा बलात्काराचे गुन्हे दाखल केले जातात. लिव्ह इनमध्ये राहून सहमतीने संबंध ठेवल्यानंतरही मुली बलात्काराच्या तक्रारी दाखल करतात. मी महिला/मुलींना आवाहन करते की, त्यांनी आधी नातं समजून घ्यावं. जर तुम्ही अशा प्रकारच्या नातेसंबंधांमध्ये आहात, त्याचा परिणाम वाईटच होईल. सहमतीने संबंध ठेवल्यानंतर नातं तुटल्यानंतरच्या अनेक घटना आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

अल्पवयीन असणाऱ्या मुलींना माझा सल्ला आहे की, कोणत्याही फिल्मी रोमान्सच्या जाळ्यात फसू नका. तुमचं कुटुंब, मित्र आणि तुमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. हल्ली १८ व्या वर्षीच लग्न करण्याचं प्रमाण वाढलं आहे. पुढे काही वर्षानंतर जेव्हा मुलं होतात, तेव्हा दाम्पत्याला सोबत राहणं अवघड होत आहे,” असं नायक म्हणाल्या. “बहुतांश घटना अशा आहेत की लिव्ह इनमध्ये राहून सहमतीने संबंध ठेवल्यानंतरही मुली बलात्काराच्या तक्रारी दाखल करतात. मी महिला/मुलींना आवाहन करते की, त्यांनी आधी नातं समजून घ्यावं. जर तुम्ही अशा प्रकारच्या नातेसंबंधांमध्ये आहात, त्याचा परिणाम वाईटच होईल,” असा सल्ला त्यांनी दिला.