सोनं खरेदीसाठी चांदीचे दिवस, चांदी खरेदीसाठी सोन्याचे दिवस

गेल्या वर्षात सातत्यानं चढत राहिलेले सोन्याचांदीचे भाव आता घसरायला सुरुवात झालीय. सोनं त्याच्या उच्चांकापासून तब्बल ११ हजार रुपयांनी स्वस्त झालंय. तर चांदीचे भावदेखील सातत्यानं खाली येत आहेत. सोन्याचे भाव प्रतितोळा ४४ हजार ९३० रुपये, तर चांदीचे भाव प्रति किलो ६७ हजार ५१० रुपयांवर आले आहेत. सोनं आणि चांदी खरेदी करण्यासाठी ही उत्तम वेळ असल्याचं मानलं जातंय. 

    सोनं आणि चांदी हे खरं तर भारतीयांचे विक पॉईंट्स. सोन्याला गुंतवणुकीचं साधन म्हणून महत्त्व आहेच, मात्र त्याचसोबत एक सांस्कृति महत्त्वदेखील आहे. भारत हा उत्सवप्रिय लोकांचा देश समजला जातो आणि प्रत्येक उत्सवात सोन्याचांदीच्या दागिन्यांना अपार महत्त्व असतं.

    गेल्या वर्षात सातत्यानं चढत राहिलेले सोन्याचांदीचे भाव आता घसरायला सुरुवात झालीय. सोनं त्याच्या उच्चांकापासून तब्बल ११ हजार रुपयांनी स्वस्त झालंय. तर चांदीचे भावदेखील सातत्यानं खाली येत आहेत. सोन्याचे भाव प्रतितोळा ४४ हजार ९३० रुपये, तर चांदीचे भाव प्रति किलो ६७ हजार ५१० रुपयांवर आले आहेत. सोनं आणि चांदी खरेदी करण्यासाठी ही उत्तम वेळ असल्याचं मानलं जातंय.

    गेल्या वर्षीच्या विक्रमी दरांपासून सोन्याचा दर प्रति तोळा ११ हजार रुपयांनी तर चांदीचा दर प्रति किलो ११ हजार रुपयांनी कमी झालाय. सरकारनं जाहीर केलेल्या गोल्ड बॉन्ड स्किममध्येदेखील यंदा सोन्याचा दर बाजारभावापेक्षा कमी ठेवण्यात आलाय. सोनं आणि चांदी खरेदी ऑनलाईन पद्धतीनं करण्याला सध्या अनेकजण पसंती देतात. गुंतवणुकीसाठी दागिन्यांऐवजी सोन्याची बिस्किटं सतोखरेदी करण्याकडं कल असतो. तर प्रत्यक्ष सोनं घरात ठेवण्याऐवजी ऑनलाईन गोल्ड बॉन्ड्स घेणं अधिक पसंत केलं जातं.

    अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह पॉलिसीनंतर सोन्याचांदीच्या भावात चांगलीच घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र भारतात ही घसरण लवकरच थांबेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. सध्या लग्नसराई आणि सणासुदीचा काळ सुरू होत असल्यामुळे सोने आणि चांदी खरेदीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.