गुड न्यूज : श्रीरामाच्या सामान्य भक्तांसाठी डिसेंबर २०२३ पासून खुले होणार अयोध्येचे भव्य राममंदिर

मंदिराच्या बांधकामाशी संबंधित लोकांनी या वर्षाच्या सुरुवातीपासून अनेकदा पुन्हा पुन्हा वक्तव्य केले आहे की, दोन वर्षांच्या आतच मंदिरात पूजा सुरू होईल आणि सामान्य भक्तांना श्रीरामाचे दर्शन घेण्याची परवानगी देण्यात येईल. यावरून अंदाज लावता येऊ शकतो की, डिसेंबर २०२३ पर्यंत मंदिराचे काम जवळपास पूर्ण होईल आणि लोक प्रभू श्रीरामाची पूजा करू शकतील.

  नवी दिल्ली : अयोध्येत (Ayodhya) उभारले जाणारे भव्य राम मंदिर (Ram Mandir) डिसेंबर २०२३ पर्यंत भक्तांसाठी खुले होणार आहे. भारतासह जगभरातील भाविक प्रभू रामचंद्राचे दर्शन घेऊ शकतील. राम मंदिर ट्रस्टच्या (ram mandir trust) हवाल्याने सूत्रांनी ही माहिती दिली आहे. यापूर्वीही राम मंदिराच्या बांधकामाची देखरेख करणाऱ्या श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने म्हटले होते की, २०२३च्या अखेरीस मंदिराचा मुख्य परिसर तयार होईल आणि त्यानंतर ते भक्तांसाठी खुले केले जाऊ शकते.

  मंदिराच्या बांधकामाशी संबंधित लोकांनी या वर्षाच्या सुरुवातीपासून अनेकदा पुन्हा पुन्हा वक्तव्य केले आहे की, दोन वर्षांच्या आतच मंदिरात पूजा सुरू होईल आणि सामान्य भक्तांना श्रीरामाचे दर्शन घेण्याची परवानगी देण्यात येईल. यावरून अंदाज लावता येऊ शकतो की, डिसेंबर २०२३ पर्यंत मंदिराचे काम जवळपास पूर्ण होईल आणि लोक प्रभू श्रीरामाची पूजा करू शकतील.

  योगी आदित्यनाथ अयोध्येला जाणार, पंतप्रधान मोदी संबोधित करू शकतात

  गुरुवारी अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीला एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येला भेट देतील. असे म्हटले जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील या कार्यक्रमाला व्हर्च्युअली संबोधित करण्याची शक्यता आहे.

  ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते भूमिपूजन

  गेल्या वर्षी कोरोना प्रतिबंधादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. अयोध्येत आयोजित सरकारी कार्यक्रमांतर्गत १०० हून अधिक लोकांना पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ देण्यात येईल. तत्पूर्वी मंगळवारी पंतप्रधान मोदींनी गुजरातमधील योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

  good news ayodhya ram mandir to open for the common peoples by december 2023 said sources