दिलासादायक बातमी : एच -1 बी व्हिसावरील डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकन कोर्टाने ठरवले रद्दबातल

नवी दिल्ली: अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय आयटी नोकरदारांसाठी एक दिलासाची बातमी आहे. ऑक्टोबरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने केलेल्या एच -१ बी व्हिसा (H-1B Visa) कार्यक्रमातील बदल अमेरिकन कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे अमेरिकेतील भारतीय कुशल कारागीर किंवा व्यावसायिक आता पूर्वीप्रमाणेच अमेरिकेत काम करू शकतील.

– प्रकरण काय आहे
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर , यावर्षी ऑक्टोबरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी एच -1 बी व्हिसा कार्यक्रमामध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्यामागे ट्रम्प प्रशासनाला असे वाटत होते की कोरोनामुळे बर्‍याच अमेरिकन लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत, म्हणून बाहेरच्या देशातून कामासाठी येणाऱ्यांना थांबवून स्थानिक लोकांना त्या नोकर्‍या दिल्या जाऊ शकतात. या उद्देशाने परदेशी व्यावसायिक भरती करणार्‍या कंपन्यांवर अनेक प्रकारचे निर्बंध लादले गेले. नवीन नियम इतके कठोर होते की जवळजवळ एक तृतीयांश अर्जदारांना एच -1 बी व्हिसा मिळू शकला नाही. आता सत्ता बदलल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आदेशातही बदल करण्यात आला आहे.

-अनेकांना होणार लाभ
अमेरिका सरकार दरवर्षी बाहेरून येणाऱ्या सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांना ८५ हजार एच -1 बी व्हिसा देऊ करते. त्यात आयटी व्यावसायिकांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या अमेरिकेत सुमारे ६ लाख एच -1 बी व्हिसाधारक कार्यरत आहेत. त्यातील बहुतेक जण भारतातील आहेत. दुसर्‍या क्रमांकावर चीनमधले कर्मचारी आहेत.

-कोर्ट काय म्हणाले
कॅलिफोर्नियाचे जिल्हा न्यायाधीश जेफरी व्हाईट यांनी ट्रम्प यांनी एच -1 बी व्हिसावरील आदेश रद्दबातल ठरवत निर्णय घेताना पारदर्शकतेच्या प्रक्रियेचे पूर्ण पालन केले नाही , असे म्हटले आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे गेलेल्या लोकांच्या नोकर्‍यामुळे निर्णय घेण्याचा सरकारचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे.