मोठी बातमी! | अनेक देशांमधील मोफत आणि मुक्त इंटरनेट धोक्यात ; गुगलचे बॉस सुंदर पिचाईंनी केला मोठा खुलासा | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
देश
Published: Jul 13, 2021 04:44 PM

मोठी बातमी!अनेक देशांमधील मोफत आणि मुक्त इंटरनेट धोक्यात ; गुगलचे बॉस सुंदर पिचाईंनी केला मोठा खुलासा

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
अनेक देशांमधील मोफत आणि मुक्त इंटरनेट धोक्यात ; गुगलचे बॉस सुंदर पिचाईंनी केला मोठा खुलासा

जगातील अनेक देश माहितीचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अधिकाधिक घट्ट सीमा आखण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या देशांमध्ये मजबूत लोकशाही परंपरा आणि मूल्ये आहेत. त्या देशांनी इंटरनेटचे तुकडे करण्याच्या धोक्याविरुद्ध उभे राहिले पाहिजे, असे सुंदर पिचाई म्हणाले. 

  नवी दिल्ली : अनेक देशांमधील मोफत आणि मुक्त इंटरनेट धोक्यात असल्याचा मोठा खुलासा गुगलचे बॉस सुदंर पिचाई यांनी केला आहे. एका मुलाखती दरम्यान बोलत असताना, त्यांनी इंटरनेटबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. काही देश ऑनलाईन माहितीवर सातत्याने बंधने घालत कायदे बनवत आहेत. तसेच जगातील अनेक देशांमध्ये माहितीचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न होत आहे. मोफत आणि खुल्या इंटरनेटची कल्पना गृहित धरली जाते आहे. अशा प्रकारचं मोठं वक्तव्य सुंदर पिचाई यांनी केलं आहे.

  सुंदर पिचाई यांचं इंटरनेटबाबत नेमकं मत काय ?

  अनेक देशांमध्ये इंटरनेटवर बंधने घातली जाते आहेत, माहितीच्या प्रवाहाला आडकाठी करण्यात येत आहे. मोफत आणि खुल्या इंटरनेटची कल्पना गृहित धरली जात आहे. असे केल्यामुळे आपण उलटा प्रवास करू. मला वाटते मोफत आणि खुले इंटरनेट ही चांगल्या गोष्टींसाठी एक जबरदस्त ताकद आहे. असं म्हणत पिचाई यांनी आपलं मत मांडलं आहे.

  जगातील अनेक देश माहितीचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्नात

  जगातील अनेक देश माहितीचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अधिकाधिक घट्ट सीमा आखण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या देशांमध्ये मजबूत लोकशाही परंपरा आणि मूल्ये आहेत. त्या देशांनी इंटरनेटचे तुकडे करण्याच्या धोक्याविरुद्ध उभे राहिले पाहिजे, असेही सुंदर पिचाई म्हणाले.

  अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बंधने घालण्याचा प्रयत्न 

  मागील महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघानेदेखील याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारतातील नवे नियम आंतरराष्ट्रीय मानवाधिकारांचे निकष पूर्ण करत नाहीत आणि अभिव्यक्तीवर बंधने घालण्यासंदर्भात आम्हाला चिंता वाटते. मात्र भारत सरकारने या शक्यता आणि ही मते फेटाळून लावली आहे.

  तुम्हाला या बातमी बाबत काय वाटते? ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा…

  Comments
  Advertisement
  Advertisement
  दिनदर्शिका
  ३१ शनिवार
  शनिवार, जुलै ३१, २०२१

  ऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.