metro

कोरोनामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाउन हळूहळू शिथिल केला जात असून, अनलॉक ३ चा टप्पा ३१ ऑगस्टला संपत असल्यानं केंद्र सरकारकडून अनलॉक ४ मध्ये नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

नवी दिल्ली) : कोरोना (corona) मुळे लागू करण्यात आलेला लॉकडाउन (lockdown) हळूहळू शिथिल केला जात असून, अनलॉक ३ (unlock 3) चा टप्पा ३१ ऑगस्टला संपत असल्यानं केंद्र सरकार (central government) कडून अनलॉक ४ मध्ये (unlock 4 in india) नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकारनं धार्मिक सांस्कृतिक, राजकीय, मनोरंजन कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. तर शाळा, महाविद्यालये तूर्तास बंद ठेवण्यात आलीआहेत. परवानगी देण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

या गोष्टी सुरू होणार

७ सप्टेंबरपासून मेट्रोसेवेला मार्गदर्शक सूचनांसह मंजुरी

२१ सप्टेंबरपासून सामाजिक/ शैक्षणिक/खेळ/मनोरंजन/सांस्कृतिक/धार्मिक/राजकीय कार्यक्रम १०० जणांच्या मर्यादेसह करण्यास परवानगी. सोशल डिस्टन्सिंग, मुखपट्टी (मास्क), हँडवॉश, थर्मल स्कॅनिंग अनिवार्य

२१ सप्टेंबरपासून ओपन थिएटर उघडण्यास परवानगी

२१ सप्टेंबरपासून ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह शाळांना परवानगी

अनलॉक ४.०मध्ये २१ सप्टेंबरपासून शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी ९ ते १२ पर्यंतचे विद्यार्थी ऐच्छिक रित्या शाळेत जाऊ शकतील (कंटेनमेंट झोन असल्यास तेथील शाळांना परवानगी नाही)

२१ सप्टेंबरपासून अभियांत्रिकी आणि व्यावसायिक अभ्यासक्रम (ज्यात प्रयोगशाळा आणि प्रात्यक्षिके यांची आवश्यकता आहे) असणारे पदव्युत्तर पदवी ( पोस्ट ग्रॅज्युएशन) चे विद्यार्थी आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण संस्थांना परवानगी

या गोष्टी राहणार बंद

कंटेनमेंट झोनमध्ये ३० सप्टेंबर २०२० पर्यंत लॉकडाऊन (lockdown continues in containment zones) कोणतेही निर्बंध शिथिल होणार नाहीत.

सिनेमागृह, एंटरटेनमेंट पार्क

स्विमिंग पूल सारखी ठिकाणे