Indian Oil Corporation मध्ये नोकरीची मोठी संधी, मिळणार 50 हजार पगार, अर्ज कसा करायचा? : जाणून घ्या

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अनेक पदांवर भरती आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून 26 जुलै ही शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट https://iocl.com/ ला भेट द्या. या भरतीसंदर्भात उमेदवारांना काही शंका किंवा प्रश्न असल्यास ते recruitment2021@indianoil.in वर ईमेलच्या माध्यमातून देखील विचारू शकतात.

  नवी दिल्ली : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अनेक पदांवर भरती आहे. केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग, मॅकेनिकल इंजिनीअरिंग ही पदं भरण्यात येणार आहेत.

  दरम्यान काही उमेदवार हे ग्रॅज्युएट अप्रेंटीस इंजिनिअर म्हणून निवडले जाणार आहेत. त्यांना मासिक वेतन दिले जाणार आहे.  कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून 26 जुलै ही शेवटची तारीख आहे.

  उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट https://iocl.com/ ला भेट द्या. या भरतीसंदर्भात उमेदवारांना काही शंका किंवा प्रश्न असल्यास ते recruitment2021@indianoil.in वर ईमेलच्या माध्यमातून देखील विचारू शकतात.

  शैक्षणिक पात्रता

  एआयसीटीई / यूजीसी मान्यता प्राप्त संस्थांकडून संबंधित ट्रेडमध्ये फुल टाईम-रेग्युलर-बीई / बीटेक असणं गरजेचं आहे. याशिवाय एमटेक करणारे किंवा केलेले तरुणही अर्ज करू शकतात. उमेदवारास पात्रता पदवीमध्ये किमान 65% गुण असावेत.

  वयोमर्यादा

  पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचे वय 26 वर्षे असायला हवे.

  निवड प्रक्रिया कशी असेल

  उमेदवाराची निवड ही ग्रूप डिस्कशन, ग्रूप टास्क आणि पर्सनल इंटरव्ह्यूच्या आधारे होणार आहे. तसेच फायनल सिलेक्शन हे मेरिटच्या आधारे केलं जाईल.

  पगार

  या पदासाठी 50 हजार रुपये मासिक वेतन देण्यात येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.