काळ्या पैशांविरोधात भारताला मोठं यश; भारतीयांची दुसरी यादी स्विस बँकेकडून प्राप्त

भारत आणि स्वित्झर्लंडमधील (India and Switzerland) काळ्या पैशाची माहिती स्वयंचलितरित्या देवाणघेवाण करण्याच्या कराराच्या अंतर्गत, भारतीय नागरिकांच्या स्विस बँक (Swiss Bank ) खात्यांची दुसरी यादी (List) स्विस सरकारकडून प्राप्त झाली आहे. काळ्या पैशाविरूद्धच्या (black money) लढाईत भारताला आणखी एक मोठं यश मिळालं आहे.

भारत आणि स्वित्झर्लंडमधील (India and Switzerland) काळ्या पैशाची माहिती स्वयंचलितरित्या देवाणघेवाण करण्याच्या कराराच्या अंतर्गत, भारतीय नागरिकांच्या स्विस बँक (Swiss Bank ) खात्यांची दुसरी यादी (List) स्विस सरकारकडून प्राप्त झाली आहे. काळ्या पैशाविरूद्धच्या (black money) लढाईत भारताला आणखी एक मोठं यश मिळालं आहे. स्वित्झर्लंडच्या मते, भारतासह ८६ देशांसोबत ३१ लाख आर्थिक खात्यांबाबत माहिती देण्यात आली आहे.

स्वित्झर्लंडच्या फेडरल टॅक्स अॅंडमिनिस्ट्रेशनने (FTA) ही माहिती दिली आहे. एफटीएनं शुक्रवारी जारी केलेल्या एका वक्तव्यात भारताला AOEI अंतर्गत २०१९ मध्ये स्विस बँकेत काळा पैसा असलेल्यांची पहिली यादी मिळाली होती. यामध्ये ७५ देशांचा समावेश होता. यावर्षी देण्यात आलेल्या माहितीत तब्बल ३१ लाख खात्यांचा समावेश असल्याचं म्हटलं होतं. परंतु स्पष्टपणे यात भारताचं नावं नव्हतं.

स्वित्झर्लंडने स्विस बँकेच्या ग्राहकांच्या वित्तीय खात्यांविषयी व इतर अनेक वित्तीय संस्थांविषयी तपशील दिलेल्या प्रमुख देशांमध्ये भारताचं नाव असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. स्वित्झर्लंडकडून देण्यात आलेल्या यादीत मोठ्या प्रमाणात भारतीय संस्था आणि नागरिकांची नावं आहे. गेल्या एका वर्षात स्वित्झर्लंडमधील अधिकाऱ्यांनी १०० पेक्षा अधिक भारतीय नागरिक आणि संस्थांविषयी माहिती दिली असल्यांचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.