भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश, लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडर नदीम अबरार याला कंठस्नान

चकमकीत घरात परदेशी दहशतवादी आणि अबरार मारला गेला. घटनास्थळावरुन दोन एके -47 रायफल जप्त केली गेली आहे. कुमार यांनी अबरारने अनेक सुरक्षा दलाच्या जवानांची आणि नागरिकांची हत्या केली होती. दरम्यान, काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. रविवारी दहशतवाद्यांनी माजी एसपीओ फयाज अहमद, त्यांची पत्नी आणि मुलीची हत्या केली होती.

    श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश मिळाले आहे श्रीनगरच्या मलूरा पारींपोरा भागात कालपासून धूमश्चक्री सुरु होती. त्यात जवानांनी लष्कर ए तैय्यबाचा टॉपचा कमांडर नदीम अबरार याला कंठस्नान घातले आहे. त्याबरोबरच इतर दोन अतिरेक्यांनाही ठार मारण्यात आलंय. याच एन्काऊंटरमध्ये CRPFच्या एका अधिकाऱ्यासह दोन जवानही जखमी झालेत.

    मिळालेल्या माहितीनुसार हायवेवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांबद्दल सैन्य दलाला माहिती मिळाली. तेव्हा सतर्कता दाखवत हायवेवर पोलीस आणि सीआरपीएमने संयुक्त तपासणी केली गेली. आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी सांगितले की, ‘अबरारने एका ठिकणाविषयी सांगितलं होतं. या ठिकाणी सुरक्षा दलाने शोध मोहिम सुरू केली तेव्हा गोळीबार सुरू झाला आणि या चकमकीत अबरार मारला गेला.कुमार यांच्या मते, अबरारला सोमवारी अटक कण्यात आली होती. चौकशी दरम्यान अबरारने एका घराविषयी माहिती दिली होती. या घरात त्याने एके47 रायफल लपवली होती.सुरक्षा दल जेव्हा शस्त्रे जप्त करण्यास जात होते, तेव्हा तेथे लपलेल्या एका दहशतवाद्यांने गोळीबार केला.

    अधिकाऱ्याने सांगितलं की, चकमकीत घरात परदेशी दहशतवादी आणि अबरार मारला गेला. घटनास्थळावरुन दोन एके -47 रायफल जप्त केली गेली आहे. कुमार यांनी अबरारने अनेक सुरक्षा दलाच्या जवानांची आणि नागरिकांची हत्या केली होती. दरम्यान, काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. रविवारी दहशतवाद्यांनी माजी एसपीओ फयाज अहमद, त्यांची पत्नी आणि मुलीची हत्या केली होती. या घटनेनंतर सुरक्षा दलाने परिसरात घेराव घालत शोध मोहिम सुरू केली होती. त्यानंतर दहशतवाद्यांनी मागील आठवड्यात एक पोलीस अधिकारी आणि एका कॉन्स्टेबलची हत्या केली होती. तर शनिवारी जम्मूमधील भारतीय हवाई दलाच्या तळावर दोन ड्रोन द्वारे हल्ला झाला होता.