डीआरडीओचे मोठे यश, भारत हायपरसॉनिक मिसाईल क्लबमध्ये

भारत पुढील पाच वर्षात स्क्रॅमजेट इंजिन वापरुन मोठ्या संख्येने विकसित करणार आहे. या क्षेपणास्त्राचा वेग सेकंदाला दोन किलोमीटरपेक्षा जास्त एवढा असेल. हायपरसॉनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारत ब्राम्होस क्षेपणास्त्राची नवी ओळख घातक आवृत्ती विकसित करणार आहे.

दिल्ली : भारताने आवाजाच्या सहा पट वेगाने उड्डाण करुन लक्ष्यभेद करण्याची क्षमता असलेल्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ओडिशातील बालासोर येथे या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या चाचणीमुळे भारत हायपरसॉनिक मिसाईल क्लबमध्ये दाखल झाला. या गटात दाखल झालेला भारत हा चौथा देश आहे. अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांकडे हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आहेत. डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनाईजेशन ने हायपरसॉनिक तंत्रज्ञानाच्या डेमोन्स्ट्रेटर व्हेईकल एचएसटीडीव्ही टेस्ट यशस्वी पूर्ण केली आहे. हे मिसाईल हवेत आवाजाच्या ६ पट वेगाने अंतर कापते. तासाला १२ हजार किलोमीटरपर्यंत वेगाने जाण्याची त्याची क्षमता आहे.

लक्ष्यभेद कठीण

बॅलेस्टीक क्षेपणास्त्र हवेत नष्ट करणे कठीण असले तरी अशक्य नाही. बॅलेस्टीक क्षेपणास्त्रांचा वेध घेणारी क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्रे कार्यरत आहेत. मात्र हायपरसॉनिक क्षेपणास्त्र शत्रूच्या रडारवर दिसण्याआधीच लक्ष्यभेद करते. जगात हवेतल्या हवेत नष्ट करणारे तंत्रज्ञान अद्याप विकसित झालेले नाही.

पुढील ५ वर्षांत बनणार क्षेपणास्त्रे

पंतप्रधानांची स्वावलंबी भारताची संकल्पना पूर्ण करण्यासाठी आणि हे यश संपादन करण्यासाठी मी संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या टीमचे अभिनंदन करतो. मी या प्रकल्पाशी संबंधित वैज्ञानिकांशी बोललो आणि त्यांचे अभिनंदन केले. भारताला त्यांचा अभिमान आहे.

- राजनाथसिंह, संरक्षणमंत्री