मंडपात बसून नवरदेव खात होता गुटखा, नवरीने एका मिनिटात जाग्यावर आणलं

अचानक मंडपात बसलेल्या वधूला कळते की, तिचा होणारा वर गुटखा चघळत आहे. हे कळल्यावर तिचा रागाचा पारा चढतो. यानंतर जे झालं ते पाहून लोकांनाही हसू आवरलं नाही.

    पान-मसाला किंवा गुटखा चघळण्यात भारतीय वस्ताद आहेत! काही लोक लग्नासारख्या विशेष प्रसंगीही आपले गुटखा प्रेम लपवू शकत नाहीत, यामुळे विवाहही तुटण्याची नामुश्कीही ओढवते. सध्या, लग्नाची क्लिप सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये वधू वराचा समाचार घेताना दिसत आहे. कारण भाऊसाहेब मंडपात बसून गुटखा खात होते. तूर्तास, हा व्हिडिओ कधी आणि कुठे चित्रीत करण्यात आला हे माहित नाही.

    पाहा व्हिडिओ :

    हा व्हिडिओ इन्स्टाग्राम युझर @official_niranjanm87 ने शेअर केला आहे, वास्तविक, अचानक मंडपात बसलेल्या वधूला कळते की, तिचा होणारा वर गुटखा चघळत आहे. हे कळल्यावर तिचा रागाचा पारा चढतो. यानंतर जे झालं ते पाहून लोकांनाही हसू आवरलं नाही.

    व्हिडिओत काय आहे…

    व्हिडिओत आपण पाहू शकता की, वधू आणि वर मंडपात बसले आहेत. अचानक वधू पंडितजींना थांबण्यास सांगते आणि रागाच्या भरात जवळ बसलेल्या व्यक्तीला थप्पड मारते. यामध्ये वराच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही, तो फक्त उम… उम… करतो. वधू खूप जोरात त्यालाही एक ठेवून देते आणि ओरडते की तुझ्या तोंडात गुटखा आहे, थुंक….यानंतर नवरदेव उभा राहतो आणि गुटखा थुंकतो.