कोरोना लशीवरील GST कायम; अर्थमंत्र्यांची मोठा घोषणा

कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेमुळे (Second Wave of COVID-19) देशात हाहाकार माजला आहे. या लाटेचा परिणाम सध्या कमी होत असला तरी झालेले नुकसान मोठे आहे. आर्थिक नुकसानाबरोबरच इतर काही आजारांनी देखील यावेळी डोकं वर काढलं आहे. कोरोनासोबतच ब्लॅंक फंगस (Black Fungus), व्हाईट फंगस ( White Fungus ) या संसर्गजन्य आजाराचा धोका अद्याप कायम आहे. 

    नवी दिल्ली: ब्लॅक फंगसच्या औषधावर कर आणि कोरोना लशीवरील जीएसटी यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे की कोरोना लशीवरील जीएसटीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

    कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेमुळे (Second Wave of COVID-19) देशात हाहाकार माजला आहे. या लाटेचा परिणाम सध्या कमी होत असला तरी झालेले नुकसान मोठे आहे. आर्थिक नुकसानाबरोबरच इतर काही आजारांनी देखील यावेळी डोकं वर काढलं आहे. कोरोनासोबतच ब्लॅंक फंगस (Black Fungus), व्हाईट फंगस ( White Fungus ) या संसर्गजन्य आजाराचा धोका अद्याप कायम आहे.

    कोरोनासह, ब्लॅक फंगसवरील उपचारासाठी आवश्यक घटकांच्या किंमती आटोक्यात आणाव्यात अशी मागणी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या जीएसटी काउन्सिलच्या (GST Council Meeting) बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाली.