haj yatra

हज कमिटी ऑफ इंडियाने हज यात्रा २०२१(Haj 2021) चे सर्व अर्ज रद्द केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील लोकांना हज यात्रेला जाता येणार नाही.

    कोरोनामुळे(Corona) अनेक धार्मिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. अशातच कोरोनामुळे यावर्षीही हज(Corona Effect On Haj) होणार नसल्याची माहिती मिळाली आहे. हज कमिटी ऑफ इंडियाने हज यात्रा २०२१(Haj 2021) चे सर्व अर्ज रद्द केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील लोकांना हज यात्रेला जाता येणार नाही.


    सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाने कोरोना साथीमुळे इतर देशांतून येणाऱ्या यात्रेकरूंसाठी हज यात्रेवर बंदी घातली आहे. सौदी अरेबिया फक्त ६० हजार स्थानिक लोकांना कोरोनामुळे हज करण्यास परवानगी देणार असल्याचे समजते.

    कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता हज कमिटी ऑफ इंडियाने हज २०२१ साठीचे सर्व अर्ज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हज यात्रेसाठी आणखी एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे.