anil vij

हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज(haryana health minister is corona positive यांना कोवॅक्सिन ही कोरोनाची लस देण्यात आली होती. मात्र आता त्यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. आपल्याला कोरोना झाला असल्याचे विज यांनी ट्विट करून सांगितले आहे.

विविध ठिकाणी सध्या कोरोना लसींवर(corona vaccine) संशोधन सुरु आहे. लसींचे डोस देऊन त्याची चाचणी करण्याचे काम सुरु आहे. पण देशात एक वेगळीच बाब समोर आली आहे. कोरोना लसीचा डोस दिलेल्या व्यक्तीलाच कोरोना झाल्याची माहिती मिळाली आहे. हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज(haryana health minister is corona positive) यांना कोवॅक्सिन ही कोरोनाची लस देण्यात आली होती. मात्र आता त्यांनाच कोरोनाची लागण झाली आहे.

आपल्याला कोरोना झाला असल्याचे विज यांनी ट्विट करून सांगितले आहे. संपर्कात आलेल्यांनाही त्यांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांना उपचारासाठी अंबाला येथील छावणीमधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

विज यांना कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कोरोनाची लागण झालेले अनिल विज हे भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये सहभागी झाले होते. महिनाभरापूर्वी कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी विज यांनी स्वतःचं नाव दिलं होतं. रोहतकमध्ये त्यांना कोवॅक्सिन लसीचा डोस देण्यात आला होता.