हाथरस प्रकरण : कारवाईस प्रारंभ ; सीबीआय तपासाला वेग

लखनौ :  हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात आता कारवाईस प्रारंभ झाला आहे. सोमवारी अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी घेतली, ज्यामध्ये पीडितेच्या कुटूंबाने कोर्टासमोर आपली व्यथा मांडली. याबाबत पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. दुसरीकडे सीबीआयची तपासणी पथक पीडित मुलीच्या गावी पोहोचले आहे. या पथकात फॉरेन्सिक तज्ज्ञांचाही समावेश आहे. हे पथक घटनास्थळी पोहोचली आणि पुरावे जमा करण्याचाही प्रयत्न केला.

क्राईन सीन केला रिक्रिएट
सीबीआयचे पथक बुलगढी गावच्या वेगवेगळ्या भागात जाऊन तपास करण्यासाठी गेले. सीआयडीने ज्या ठिकाणी व्हीडिओग्राफी केली होती तेथे जवळपास तीन तास सीबीआयला लागले आणि पीडितेच्या कुटूंबातील सदस्यांकडून क्राईम सीन पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रश्नउत्तरांचे सत्र पार पडले. क्राईम सीननंतर सीबीआय पथकाने पोलिसांनी पीडितेवर अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणाचीही पाहणी केली.

न्याय नाही तोपर्यंत अस्थी विसर्जन नाही

हाथरस पीडितेचे कुटूंब सोमवारी रात्री 11 वाजता लखनऊला परतले. हायकोर्टात सुनावणी झाल्यानंतर पीडितेचे कुटूंबीयांना कडक सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली होती. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, न्यायालयात सर्वजण इंग्रजीत बोलत होते. त्यामुळे समजले नाही की काय सुरू आहे. मात्र, हे समजले की डीएम साहेबांनी सुनवण्यात आले होते. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझ्या मुलीच्या अस्थींचे विसर्जन करणार नाही, असे त्यांनी सांगितले.

पीडितेचे वडील आजारी
बुलगाडी गावात आल्यापासून पीडितेच्या वडिलांची प्रकृती ठिक नसल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेची आई, कुटुंबातील इतर दोन सदस्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आले आहे. पण पीडितेच्या वडिलांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला असल्याचे समजते. हाथरस वैद्यकीय अधिकारी ब्रिजेश राठोड यांनी गावात जाऊन त्यांची भेट घेणार असल्याचे सांगितलं आहे. याआधी एक वैद्यकीय टीम कुटुंबीयांच्या भेटीसाठी गेली होती. पीडितेच्या वडिलांचा ब्लड प्रेशर वाढला आहे. असे असले तरी त्यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला आहे.