yogi aadityanath

हाथरस प्रकरणी उत्तर प्रदेशातील सरकारने मोठा निर्णय घेतला आहे . मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एसपी, डीएसपी, इन्स्पेक्टर आणि काही इतर अधिकाऱ्यांना प्राथमिक तपासणी अहवालाच्या आधारे निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत माहिती दिली.

हाथरस प्रकरणी उत्तर प्रदेशातील सरकारने मोठा निर्णय घेतला आहे . मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एसपी, डीएसपी, इन्स्पेक्टर आणि काही इतर अधिकाऱ्यांना प्राथमिक तपासणी अहवालाच्या आधारे निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत माहिती दिली.एसपी विक्रांत वीर, सीओ राम शब्द, निरीक्षक दिनेश कुमार वर्मा, एसआय जगवीर सिंह अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावं आहेत.

हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी देशभर आंदोलन केली जात आहेत. दरम्यान काल पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा ताफा यमुना एक्स्प्रेसवर अडवल्याने त्यांनी पायी हाथरसच्या दिशेने रवाना होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तरीही या दोघांना तेथे जाण्यास मज्जाव करण्यात आला. पीडितेच्या मृत्यूनंतर रोष वाढल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन सदस्‍यीय एसआयटीची स्थापना केली आहे. सोबतच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना लवकरात लवकर शिक्षा देण्याचे निर्देशही दिले आहेत.अशातच आता योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकपणे या प्रकरणावर भाष्य केलं आहे. या प्रकरणामधील पीडित तरुणीच्या नातेवाईकांना तिच्यावर अंत्यसंस्कारही करुन न दिल्याने देशभरामध्ये संताप आहे.

योगींचें ट्विट
“उत्तर प्रदेशमधील सर्व आया-बहिणींच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला छेडण्याचा प्रयत्न करण्याचा विचारही करणाऱ्याचा नाश निश्चित आहे. त्यांना अशी शिक्षा केली जाईल की भविष्यात याकडे उदाहरण म्हणून पाहिलं जाईल, तुमचे उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणीची सुरक्षा आणि विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प आहे आणि वचनही आहे,” असं योगी यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.