Hathras Gang Rape Case SIT delay in report to the government
हाथरस प्रकरण SIT अहवाल खोळंबला

हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात (Hathras Gang Rape Case) स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने (SIT) अद्यापही आपला अहवाल (Report) सरकारला (government) सादर केलेला नाही. हा अहवाल सादर करण्यासाठी एसआयटीला १० दिवसांचा (10 Days) अवधी वाढवून देण्यात आला होता.

  • अजून कमीत कमी ३ दिवस लागणार

नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, लखनऊ:

हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने अद्यापही आपला अहवाल सरकारला सादर केलेला नाही. हा अहवाल सादर करण्यासाठी एसआयटीला १० दिवसांचा अवधी वाढवून देण्यात आला होता. १७ ऑक्टोबर रोजी एसआयटीला हा अहवाल सरकारला सोपवायचा होता परंतु हाथरस प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास एसआयटीला अजून कमीत कमी तीन दिवस (Three Days) लागू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

हाथरस पीडितेच्या मृत्यूनंतर प्रशासनाने मध्यरात्रीच पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यावरून वाद झाला होता. त्यानंतर योगी सरकारने एसआयटीची स्थापना केली होती. प्रारंभी सात दिवसात अहवाल सोपविण्याचे आदेश एसआयटीला देण्यात आले होते. एसआयटीने स्थानिक अधिकारी, पीडित कुटुंबातील सदस्यांसह ग्रामस्थांचीही चौकशी केली होती. त्यानंतर एसआयटीने दहा दिवसांचा अतिरिक्त अवधी मागितला होता, त्यास सरकारने मंजुरी दिली होती. प्रारंभिक तपासाच्या आधारावर हाथरस पोलिस अधीक्षकांना निलंबित करण्यात आले होते.