hathras scandal priyanka gandhi leaves for hathras security increased on all border and dnd
हथरस प्रकरणाचे दिल्लीत पडसाद, राहुल, प्रियांका हथरसकडे रवाना, उत्तर प्रदेशच्या सीमा बंद

पीडितेवर १४ सप्टेंबर रोजी सामुहिक अत्याचार करण्यात आला होता. त्यानंतर तिला अलीगढ़ येथील जेएन मोडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अत्याचाराला विरोध केल्याने आरोपींनी पीडितेचा गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. चारही आरोपींना या आधीच अटक करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : एकीकडे देशभर हाथरस कांड (Hathras Rape) प्रकरणी लोकांमध्ये रोष वाढतो आहे. आता या मुद्द्यावरून विविध राजकीय पक्षांनी उत्तर प्रदेश सरकारला (UP Government) टीकेचे धनी केले आहे. या सर्व गदारोळात एक बातमी आली आहे की, काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) आज पीडितेच्या परिवाराची हथरस येथे भेट घेण्यासाठी रवाना झाल्या आहेत.

पीडितेवर १४ सप्टेंबर रोजी सामुहिक अत्याचार करण्यात आला होता. त्यानंतर तिला अलीगढ़ येथील जेएन मोडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अत्याचाराला विरोध केल्याने आरोपींनी पीडितेचा गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. चारही आरोपींना या आधीच अटक करण्यात आली आहे. तर, पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या जबरदस्तीने अंतिम संस्कार करण्यात आले, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

प्रियांका-राहुल गांधी यांच्या येण्याची बातमी मिळताच त्यांना गौतमबुद्धनगर सोबतच मथुरेत रोकण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन्ही ठिकाणी नाक्यानाक्यावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राहुल गांधी आणि प्रियांका यांना नोएडा सीमेवरूनच माघारी पाठविण्यात येणार आहे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सर्व ठिकाणी टोल प्लाझासोबतच यमुना एकसप्रेस-वेवरही वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

प्रियांका गांधी यांची हथरसला जाण्याची सूचना मिळाल्यानंतर मथुरेत यमुना एक्सप्रेस वेवर नाक्यानाक्यावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या हथरसला जाण्याची सूचना मिळताच गौतमबुद्धनगरच्या डीएनडीवर सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. या ठिकाणी सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. तर काँग्रेसचे स्थानिक नेते डीएनडीवर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गौतमबुद्धनगरनगर सोबतच नोएडा-दिल्लीच्या सर्व सीमांवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.