देशात १८ राज्यात ब्लॅक फंगसचे ५ हजारपेक्षा जास्त रुग्ण, मधुमेह असलेल्या लोकांना जास्त धोका – आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

डॉ. हर्षवर्धन (Doctor Harshvardhan) यांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये २ हजार १६५, महाराष्ट्रात १ हजार १८८, उत्तर प्रदेशात ६६३, मध्य प्रदेशात ५१९, हरियाणात ३३९ आणि आंध्र प्रदेशात २४८ म्युकरमायकोसिसचे(Mukermycosis) रुग्ण आढळले आहेत.

  देशात कोरोनाच्या(Corona) प्रादुर्भावासह आता ब्लॅक फंगस(Black Fungus) अर्थात म्युकरमायकोसिसचे(Mukermycosis) रुग्ण वाढत आहेत. अनेक राज्यांमध्ये ब्लॅक फंगसला महामारी घोषित करण्यात आलं आहे.

  केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Harshvardhan)यांनी दिलेल्या माहितीनुसार २४ मे रोजी सकाळपर्यंत देशातील एकूण १८ राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे (ब्लॅक फंगस) एकूण ५ हजार ४२४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

  डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये २ हजार १६५, महाराष्ट्रात १ हजार १८८, उत्तर प्रदेशात ६६३, मध्य प्रदेशात ५१९, हरियाणात ३३९ आणि आंध्र प्रदेशात २४८ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत.

  देशात आढळलेल्या म्युकरमायकोसिसच्या ५ हजार ४२४ रुग्णांपैकी ४ हजार ५५६ जणांना कोरोनाची लागण झाली होती, तर ५५ टक्के रुग्णांना पहिल्यापासूनच मधुमेहाची समस्या होती.

  निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्लॅक फंगस हा आजार कोरोनाच्या आधीही अस्तित्वात होता. तसंच हा आजार मधुमेह असलेल्या व्यक्तीला, ज्यांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात नाही अशा लोकांना जास्त धोका असल्याचं वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी सांगतात. साखरेचं प्रमाण नियंत्रणात नसण्याबरोबरच अन्य आजारही ब्लॅक फंगसचे कारण बनू शकतात.

  ब्लॅक फंगसपाठोपाठ व्हाईट फंगसनेही देशात थैमान घातले आहे. त्यानंतर आता यलो फंगसने दस्तक दिली आहे. उत्तर प्रदेशात येलो फंगसचा पहिला रुग्णही सापडला आहे. ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसपेक्षा यलो फंगस अधिक धोकादायक आणि खतरनाक असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं असून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. या यलो फंगसला म्युकोर सेप्टिकस हे नाव देण्यात आलं आहे.गाझियाबादमध्ये यलो फंगसचा एक रुग्ण आढळला आहे.