rajesh bhushan

यंदाही गणेशोत्सव, दसरा,दिवाळी हे सण कोरोना नियमांसह(Corona Rules In Festival)साजरे करावे लागणार आहेत.

    कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave)अजूनही ओसरली नसल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात काळजी घेण्याची गरज आहे अशी सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सव, दसरा,दिवाळी हे सण कोरोना नियमांसह (Corona Rules In Festival)साजरे करावे लागणार आहेत. लसीकरण झाल्यानंतरही मास्क आणि कोरोनाचे नियम पाळणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

    आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही. कोरोना रुग्णसंख्येत नेहमी सणासुदीनंतर वाढ होते. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील सण जबाबदारीने साजरे करणं गरजेचं आहे. लसीकरणामुळे रोगाची तीव्रता कमी होते आणि रुग्णालयात दाखल करण्याची स्थिती ओढावत नाही. त्यामुळे लसीकरण झाल्यानंतरी मास्क आणि कोरोना नियमावलीचं पालन कराव लागेल.

    सध्या देशात रोज येणाऱ्या कोरोना प्रकरणात केरळमधून ५१ टक्क्याहून अधिक रुग्ण सापडत असल्याबद्दल आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. उत्सव काळात गर्दी टाळणं आवश्यक आहे. गर्दीमुळे कोरोना वाढू शकतो. सणासुदीच्या काळात अनिवार्य गर्दीच्या ठिकाणी दोन लस घेण्याची अट असावी.असं इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितलं.