वास आणि चवीसोबत कोरोनामुळे बहिरेपणा येत असल्याचं दिसून आलंय. काही रुग्णांच्या श्रवणयंत्रणेवर कोरोनाचा व्हायरस हल्ला करत असून त्यामुळे अनेकांना कोरोना काळात ऐकूच येत नसल्याचं दिसून आलंय. कोरोनाचा विषाणू घशावाटे किंवा नाकावाटे प्रवेश करून आता कानांच्या पडद्यांवर परिणाम करत असल्याचं सिद्ध झालंय.

    गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या विषाणूमध्ये सातत्यानं बदल होत असल्याचं सिद्ध झालंय. त्यामुळे कोरोनाची लक्षणेदेखील सातत्याने बदलत असल्याचं दिसून आलंय. साधारणपणे चव आणि वास जाणे हे कोरोना झाल्याचे लक्षण मानले जाते. मात्र आता या लक्षणांसोबत आणखी एक लक्षण दिसायला काही रुग्णांमध्ये सुरुवात झालीय.

    वास आणि चवीसोबत कोरोनामुळे बहिरेपणा येत असल्याचं दिसून आलंय. काही रुग्णांच्या श्रवणयंत्रणेवर कोरोनाचा व्हायरस हल्ला करत असून त्यामुळे अनेकांना कोरोना काळात ऐकूच येत नसल्याचं दिसून आलंय. कोरोनाचा विषाणू घशावाटे किंवा नाकावाटे प्रवेश करून आता कानांच्या पडद्यांवर परिणाम करत असल्याचं सिद्ध झालंय.

    कोरोनाचा डेल्टा हा नवा व्हेरिअंट त्यासाठी काऱणीभूत असल्याचं दिसून आलंय. ज्यांच्या शरीरात हा डेल्टा व्हेरिअंट प्रवेश करतो, अशाच रुग्णांना ऐकू येणं कमी झाल्याचे अनुभव आलेत. त्यासोबत पोटात दुखणे, मळमळणे असा प्रकारची लक्षणेदेखील आढळून येत आहेत.

    डेल्टा हा नवा व्हेरिअंट लसींच्या संरक्षणालाही कधीकधी दाद देत नसल्याचं दिसून आलंय. लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांनाही कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनचा त्रास होत असून त्यांच्यात इतरांच्या मानाने सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. कोरोनाचा हा नवा असून यानंतर जसजसे नवनवे स्ट्रेन येत राहतील, तसतसा लक्षणांमध्ये बदल झाल्याचं दिसू शकतं, असा अंदाज तज्ज्ञ डॉक्टर व्यक्त करत आहेत.