ऐतिहासिक ! संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सीमाभागात ४४ पुलांचं उद्घाटन

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सीमाभागात असणाऱ्या ४४ प्रमुख पूल राष्ट्राला समर्पित केले.यामुळे देशाच्या पश्चिम, उत्तर आणि ईशान्येकडील संवेदनशील सीमा भागामध्ये रस्ते आणि पुलांच्या माध्यमातून कायमस्वरूपी संपर्क व्यवस्था निर्माण झाली आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अरूणाचल प्रदेशातल्या नेचिफू बोगद्याचा शिलान्यास केला. या बोगद्यामुळे अतिदुर्गम प्रदेशातल्या जनतेला संपर्क सुविधा मिळू शकणार आहे त्याचबरोबर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हा बोगदा अतिशय महत्वाचा ठरणार आहे.

आज देशाला समर्पित करण्यात आलेले ४४ पूल सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत. व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री डाॅ. जितेंद्र सिंह, संरक्षण कर्मचारी प्रमुख जनरल बिपीन रावत, लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे आणि संरक्षण सचिव अजय कुमार यांनी नवी दिल्लीतून कार्यक्रमाला उपस्थिती लावली. तसेच केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू, अरूणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, सिक्कीम आणि उत्तराखंड या राज्यांचे मुख्यमंत्री आणि जम्मू आणि काश्मिरचे नायब राज्यपाल, संसदेतील खासदार, नागरी आणि लष्करी विभागातील वरिष्ठ अधिकारी, तसेच वेगवेगळ्या राज्यातले, केंद्रशासित प्रदेशातले नेते व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून ठिकठिकाणाहून या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात बीआरओ म्हणजेच सीमा रस्ते संघटना खात्याचे महा संचालक आणि सर्व श्रेणीच्या अधिकारी वर्गाचे अभिनंदन केले. एकाचवेळी ४४ पूल राष्ट्राला समर्पित करणे, हा एक विक्रम आहे असे सांगून सिंह म्हणाले, कोविड-१९ महामारीच्या आव्हानात्मक काळ आहेच त्याचबरोबर पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून सरहद्दीवर तणावाची स्थिती निर्माण केली जात आहे. त्यांचा देशाला सामना करावा लागत आहे. असे वाद सुरू असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशामध्ये सर्व क्षेत्रामध्ये विकासाची कामे होत आहेत आणि ऐतिहासिक बदल घडवून आणले जात आहेत.या पुलांची कामे पूर्ण झाल्यामुळे आता संपूर्ण वर्षभर सशस्त्र दलाला वाहतूक करणे शक्य होणार आहे तसेच त्यांना लागणारी सामग्री, रसद पुरविणे शक्य होणार आहे, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.