बर्गरची होम डिलिव्हरी चालते, मग रेशनची का नको? केजरीवालांचा मोदींना सवाल

तुम्ही रेशन माफियांसोबत उभे राहणार असाल तर मग गरिबांसोबत कोण उभं राहील. त्या ७० लाख गरिबांचे काय होईल. ज्यांचे रेशन हे रेशन माफिया चोरून नेतात. या देशात जर स्मार्टफोन, पिझ्झाची होम डिलिव्हरी होऊ शकते. मग रेशनची का नाही. पंतप्रधान मोदीजी तुम्हाला रेशन माफियांबाबत एवढी सहानुभूती का आहे. अशी टीका केजरीवाल यांंनी केंद्र सरकारवर केली आहे.

    नवी दिल्ली – देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये घरपोच रेशन योजना सुरू करण्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला वाद वाढत आहे. यादरम्यान अरविंद केजरीवार यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. दिल्लीमध्ये पुढील आठवड्यापासून घरपोच रेशन पुरवण्याचे काम सुरू झाले असते. सर्व तयारी झाली होती. मात्र अचानक केंद्र सरकारने यासाठी परवानगी घेतली नसल्याचे सांगत परवानगी नाकारली, ही बाब चुकीची आहे, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.

    अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, आम्ही एकवेळ नाही तर पाच वेळा केंद्राची परवानगी घेतली आहे. कायदेशीररीत्या अशा परवानगीची आवश्यकता नाही. रेशनची होम डिलिव्हरी होण्यात गैर काय आहे. तुम्ही रेशन माफियांसोबत उभे राहणार असाल तर मग गरिबांसोबत कोण उभं राहील. त्या ७० लाख गरिबांचे काय होईल. ज्यांचे रेशन हे रेशन माफिया चोरून नेतात. या देशात जर स्मार्टफोन, पिझ्झाची होम डिलिव्हरी होऊ शकते. मग रेशनची का नाही. पंतप्रधान मोदीजी तुम्हाला रेशन माफियांबाबत एवढी सहानुभूती का आहे. असं केजरीवाल म्हणाले.