गृहमंत्री अमित शाह यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह

दिल्ली :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आली असल्याची माहिती स्वतः अमित शाह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन  ट्विट करत दिली आहे.  अमित शाह यांना २ ऑगस्ट रोजी करोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. यानंतर त्यांच्यावर मेदांता हॉस्पिटलमध्ये  उपचार सुरु होता. आज त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर  डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पुढचे काही दिवस मी स्वतःला होम क्वारंटाइन करणार असल्याचं शाह यांनी स्पष्ट केलं आहे.

 

यावेळी अमित शाह यांनी आपण हॉस्पिटलमध्ये असताना आपल्या प्रकृतीची काळजी घेतलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. याचसोबत मेदांता हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचेही शाह यांनी आभार मानले आहेत.