Honor Killing in Karnataka Interracial love affair father kills daughter
कर्नाटकात ऑनर किलिंग; आंतरजातीय प्रेमसंबंध, वडिलांनी केली मुलीची हत्या

कर्नाटकची (Karnataka) राजधानी बंगळुरूपासून (Bengaluru) ५० किमी अंतरावर असलेल्या रामगनाग्रा जिल्ह्यातील (Ramaganagra District) बेताहल्ली गावात (Betahalli Village) ऑनर किलिंगचे (honour killing) प्रकरण समोर आले आहे. दुसऱ्या जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध (love affair) असल्याच्या रागातून एका तरुणीची तिच्या वडिलांनी आणि दोन चुलत भावांनी मिळून हत्या (murder) केली. तरुणीचा मृतदेह (young girl dead body) सापडल्यानंतर ६ दिवसांनी पोलिसांनी (police) तिन्ही आरोपींना अटक (arrest) केली आहे.

नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, बंगळुरू :

कर्नाटकची राजधानी बंगळुरूपासून ५० किमी अंतरावर असलेल्या रामगनाग्रा जिल्ह्यातील बेताहल्ली गावात ऑनर किलिंगचे प्रकरण समोर आले आहे. दुसऱ्या जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून एका तरुणीची तिच्या वडिलांनी आणि दोन चुलत भावांनी मिळून हत्या केली. तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर ६ दिवसांनी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या तरुणीचे एका दलित मजूराशी प्रेमसंबंध होते. पोलिसांनी सुरुवातीला तरुणी बेपत्ता असल्याची नोंद केली होती. पण नंतर ऑनर किलिंगची ही घटना असल्याचे उघडकीस आले.

तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार Honor Killing in Karnataka

आरोपींमध्ये तरुणीचे वडील कृष्णप्पा, दोन चुलत भाऊ चेतन (२१) आणि १७ वर्षीय अल्पवयीनाचा समावेश आहे. तरुणीच्या वडिलांनी ९ ऑक्टोबरला ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. ही तरुणी बी. कॉमच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. तक्रार नोंदवल्यानंतर दुसऱ्यादिवशी तक्रारदाराच्या भावाच्या शेतात तरुणीचा मृतदेह आढळला. पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी तिघांनी हत्येचे कारस्थान रचले होते. ८ ऑक्टोबरला तिघांनी मिळून मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह शेतात पुरला. दुसऱ्या दिवशी आरोपी असलेल्या मुलीच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक सीमंत कुमार सिंह यांनी दिली.

प्रियकरावर लावला आरोप Interracial love affair

तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर कृष्णप्पाने तरुणीच्या प्रियकरावर हत्येचा आरोप केला होता. यानंतर नेमके काय प्रकरण आहे, ते शोधून काढण्यासाठी पोलिसांनी २१ सदस्यीय पथकाची स्थापना केली होती. १० ऑक्टोबर रोजी मुलीचा मृतदेह सापडला. कुटुंबासमोर मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुलीच्या पालकांच्या चेहऱ्यावर कुठलेही दु:खाचे भाव दिसले नाहीत. पोलिसांनी या प्रकरणी कसून चौकशी केल्यानंतर हे ऑनर किलिंगचे प्रकरण असल्याचे समोर आले, अशी माहिती रामगनाग्राचे एसपी गिरीश यांनी दिली.