rahul gandhi and narendra modi

नव्या कृषी कायद्यांविरोधात(agricultural law) गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन(farmers protest)  सुरु आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी(rahul gandhi) यांनी ट्विटरवर(twitter) विचारले आहे की, कृषी कायदे हटवण्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांना आणखी किती बलिदान द्यावे लागेल? 

नव्या कृषी कायद्यांविरोधात(agricultural law) गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन(farmers protest)  सुरु आहे. शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आता या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे शेतकऱ्यांनी ठरवले आहे. तसेच शेतकरी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे.  या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.


राहुल गांधी यांनी ट्विटरवर विचारले आहे की, कृषी कायदे हटवण्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांना आणखी किती बलिदान द्यावे लागेल?  काँग्रेसने म्हटले आहे की, कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आतापर्यंत ११ शेतकऱ्यांना आपला जीव गमावावा लागला आहे.  केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या संवैधानिक वैधतेला आव्हान देणाऱ्या प्रलंबित याचिकांमध्ये पक्षकार करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान युनियनने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे असंवैधानिक, शेतकरीविरोधी आहेत. हे कायदे शेतक ऱ्यांच्या हिताचे नाहीत, तर त्यामागे कंपन्यांचे हित साधण्याचा कुटिल हेतू आहे, असे भारतीय किसान युनियनने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत नमूद केले आहे.

राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करत शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरचा विश्वास उडाला असल्याची टीका केली होती. तसेच कृषी कायदे हे देशातल्या शेतकऱ्यांचं हित साधणारेच आहेत,असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं. असं असेल तर मग आज शेतकरी रस्त्यावर का आहेत? आपल्या देशातला शेतकरी हा देशाच्या जडणघडणीतला एक जबाबदार घटक आहे. तो मागे हटणार नाही आणि घाबरणार नाही असंही राहुल गांधी यांनी त्यावेळी म्हटलं होतं.