भारतात कोरोना लसीची किंमत किती? डीसीजीआयने सांगितलं असं काही…

येत्या वर्षभरात देशातील २० ते २५ कोटी लोकांना कोरोना लस (corona vaccine) टोचण्यासाठी भारताला सुमारे ५० हजार कोटी रूपये खर्च (Cost) करावे लागतील. कोरोना प्रतिबंधक लसीच्या एका डोसची किंमत चार ते पाच डॉलर म्हणजेच ३०० ते ४०० रूपये असण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा (Corona Virus) प्रभाव दिवसागणिक देशात वाढतच आहे. तसेच कोरोनावरील लसींचं कामं देखील वेगाने सुरू आहे. येत्या वर्षभरात देशातील २० ते २५ कोटी लोकांना कोरोना लस (corona vaccine) टोचण्यासाठी भारताला सुमारे ५० हजार कोटी रूपये खर्च (Cost) करावे लागतील. कोरोना प्रतिबंधक लसीच्या एका डोसची किंमत चार ते पाच डॉलर म्हणजेच ३०० ते ४०० रूपये असण्याची शक्यता आहे.

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI ) यांनी सांगितले की, कोरोना प्रतिबंधक लसीच्या एका डोसची किंमत एक हजार रूपयांपेक्षा कमीच असेल. २० ते २५ कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लस द्यायची झाल्यास त्यासाठी ४० ते ५० कोटी डोसची आवश्यकता भासणार आहे. भारताला कोरोना देण्याचे आश्वासन जागितक आरोग्य संघटना, गेट्स फाऊंडेशनप्रणित ग्लोबल व्हॅक्सिन अलायन्स लसउत्पादन क्षेत्रातील भारतीय कंपन्यांनी दिले आहे.

अमेरिका, इंग्लंड, युरोप आणि अन्य खंडातील काही देशांनी कोरोना लस विकसित करण्यासाठी संशोधन करणाऱ्या औषध कंपन्यांना त्याचा मोबदला देऊ केला आहे. मात्र, भारत सरकारने असा मोबदला कंपन्यांना दिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमलेल्या कृती गटाचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल जगभरातील कोरोना लस घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. असे सांगितले.