indian politician

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाने आपल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचा तपशील सार्वजनिक केला आहे. पंतप्रधानांच्या अधिकृत वेबसाइटवर सर्व मंत्र्यांचा तपशील पाहता येईल. हा तपशील ३१ मार्च २०२० पर्यंतचा आहे. केवळ पंतप्रधानांनी ३० जूनपर्यंत तपशील ठेवला आहे.

How much wealth does Modi, Shah, Gadkari have?

दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाने आपल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचा तपशील सार्वजनिक केला आहे. पंतप्रधानांच्या अधिकृत वेबसाइटवर सर्व मंत्र्यांचा तपशील पाहता येईल. हा तपशील ३१ मार्च २०२० पर्यंतचा आहे. केवळ पंतप्रधानांनी ३० जूनपर्यंत तपशील ठेवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मोदींच्या संपत्तीत किंचित वाढ झाली आहे, पण गृहमंत्री अमित शाह यांचे मालमत्ता मूल्य कमी झाल्याने शेअरच्या किंमतीत घट झाली आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या संपत्तीत कोणताही बदल झालेला नाही.  ३० जून २०२० पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सुमारे २.८५ कोटी रुपये जंगम आणि स्थावर संपत्ती होती. २०१९ मध्ये अमित शाह यांची संपत्ती ३२.३ कोटी रुपये होती, ती ३१ मार्च २०२० पर्यंत घटून २८.६ कोटी रुपये झाली.

मोदी करतात पगारातून बचत

पगार : २ लाख रुपये प्रति महिना.
रोख रक्कम : ३१४५० रुपये.

जंगम संपत्ती : पंतप्रधान मोदींच्या बचत खात्यात ३ लाख ३८ हजार रुपये जमा, फिक्स्ड डिपॉझिटची किंमत १ कोटी ६० लाख २८ हजार ३९ रुपये इतकी आहे. तर सोन्याच्या एकूण चार अंगठ्या.

स्थावर संपत्ती : गांधीनगर येथे १.१ कोटीच्या घरात २५% भागिदारी.

गुंतवणूक : नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्ड्स, जीवन विमा

राजनाथसिंह यांच्या मालमत्ता स्थिर

रोख रक्कम : ७२ हजार रुपये

जंगम मालमत्ता: बचत खात्यात २५ लाख रुपये जमा, फिक्स्ड डिपॉझिटचे मूल्य ७६ लाखांहून अधिक, ६० ग्रॅम सोने, तीन लाखांचे दागिने, एक रिव्हॉल्व्हर, २ पाइप गन.

स्थावर मालमत्ता: संरक्षणमंत्र्यांच्या नावे चंदोली येथे १ कोटी ४७ लाख, ३० हजार ५८० रुपयांची शेतजमीन. लखनौ येथे १५ कोटी रुपये किंमतीचे घर.

गुंतवणूक: राजनाथसिंह बँकेत गुंतवणूक करतात.

अमित शाह यांनी गुंतवलाय शेअरमध्ये पैसा

रोख रक्कम : १५८१४ रुपये

जंगम मालमत्ता : बचत खात्यात १ कोटी ४ लाख २९ हजार ७४९ रुपये जमा, मुदत ठेव मूल्य २ लाख ७९ हजार, ४४.४७ लाखांचे दागिने, ३०८१४० रुपयांचे सिक्युरिटीज, १३ कोटी ५४ लाख रुपयांची कोटेड सेक्युरिटी, एकूण १५ लाख २३ हजार कोटी रुपयांची जंगम मालमत्ता

स्थावर मालमत्ता: एकूण १३ कोटी ६६ लाख रुपयांपैकी ७ कोटी ८५ लाख रुपायांची पितृक संपत्ती

गुंतवणूक: बचत खाते, फिक्स्ड डिपॉझिट, शेअर, विमा

गडकरींवर दीड कोटींची उधारी

रोख रक्कम : ५३०० रुपये.

जंगम मालमत्ता : गडकरी यांच्या नावे बँकांमध्ये २५ लाख ४८ हजार २२९ रुपये जमा. ३५.५ लाख रुपयांचे शेअर. १८.१ लाखांच्या गाड्या. ३४.९२ लाख रुपयांचे दागिने.

स्थावर मालमत्ता : एकूण ४१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता.

गुंतवणूक: बचत खाते, मुदत ठेवी, शेअर, विमा
या व्यतिरिक्त नितीन गडकरी यांच्यावर दीड कोटी रुपयांची उधारी देखील आहे.

सीतारामन यांच्याकडे ९.५ लाखांचे दागिने

रोख रक्कम : २८६०० रुपये.

जंगम मालमत्ता : बँकांमध्ये १ लाख ९९ हजार ४८२ रुपये जमा. ५ लाख ६० हजार रुपयांचे व्यक्तीगत कर्ज दिले आहे. या व्यतिरिक्त ९ लाख ५४ हजार रुपये किंमतीचे दागिने.

स्थावर मालमत्ता : तेलंगणात ९.९ लाखांचे घर (संयुक्त मालकी हक्क), १६ लाख २ हजार रुपये किंमतीची विनाशेती जमीन.

गुंतवणूक : बचत खाते, मुदत ठेव