कोरोनामुक्त झाल्यानंतर अधिक सुरक्षित राहण्यासाठी कशाप्रकारे खबरदारी घ्यावी? जाणून घ्या

देशात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असली तरी दैनंदिन रुग्णवाढीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. कोरोना रूग्ण पूर्णपणे बरे झाल्यानंतर आणि अधिक सुरक्षित राहण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. तसेच कोरोना विषाणूपासून बचाव कसा करावा? (How to be safe after coronation? ) याबाबतचा कोविड मॅनेटमेंट प्रोटोकॉल (Covid Management Protocol) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ( Ministry of Health and Family Welfare) जारी करण्यात आला आहे.

देशात कोरोना विषाणूचा (Corona Virus) प्रभाव दिवसागणिक वाढत आहे. तसेच देशात गेल्या २४ तासांत ९७ हजार नव्या रूग्णांची (New Patient)  नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ४६ लाखांच्या वर पोहोचला आहे. देशभरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ७७.७७ टक्के असून मृत्यूदर १.६ टक्के इतका आहे.

देशात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असली तरी दैनंदिन रुग्णवाढीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. कोरोना रूग्ण पूर्णपणे बरे झाल्यानंतर आणि अधिक सुरक्षित राहण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. तसेच कोरोना विषाणूपासून बचाव कसा करावा? (How to be safe after coronation? ) याबाबतचा कोविड मॅनेटमेंट प्रोटोकॉल (Covid Management Protocol) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ( Ministry of Health and Family Welfare) जारी करण्यात आला आहे.

कोविड मॅनेटमेंट प्रोटोकॉलचे नियम जारी:

वैयक्तिक पातळीवर कोरोनापासून अधिक सुरक्षित राहण्यासाठी :

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे आपल्या तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे. तसेच सॅनिटायझर आणि दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे. गरम पाणी पिणे, आयुष मंत्रालयाने दिलेली प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे घ्या, हे आरोग्यासाठी उत्तम उपाय आहेत. आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी नियमित योगासने, ध्यान आणि प्राणायम करणे. त्यानंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी शांत जागेवर फिरायला जाणे म्हणजेच वॉक करणे, संतुलित आहार घेणे आणि नियमित वेळेत झोपणे. अशा प्रकारची काळजी वैयक्तिक पातळीवर घेणे खूप गरजेचे आहे.

समाजात जनजागृती करणे :

कोरोना विषाणूपासून कोरोनामुक्त झाल्यानंतर आपण कशापद्धतीने उपचार घेतले, अशा प्रकारच्या गोष्टींची समाजात जनजागृती करणे तसेच या महत्त्वाच्या गोष्टी मित्र, नातेवाईक, आणि समाजसेवक अशा व्यक्तिपर्यंत पोहोचवाव्यात. जेणेकरून लोकांच्या मनात असलेली कोरोना विषाणूची भीती कायमची दूर करता येईल.