yogi adityanath

मुख्यमंत्र्यांचा फोन उचलत नसल्याबद्दल प्रशासनाने २५ डीएम, चार कमिश्नर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असून त्यांना तीन दिवसात उत्तर देण्यास सांगितलं आहे. वाराणसी, प्रयागराज, अयोध्या आणि बरेलीच्या कमिश्नरला या नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी आणि कमिश्नर सरकारी फोन उचलत नसल्याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे वारंवार येत होत्या. त्यामुळे अखेर प्रशासनानेही ही अॅक्शन घेतली आहे.

    लखनऊ: देशातले पॉवरफुल मुख्यमंत्री अशी ख्याती असलेले योगी आदित्यनाथ यांचा कलेक्टर, कमिश्ननर, एसपी आणि एसएसपीही फोन उचलत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांचा फोन न उचलणाऱ्या २५ सरकारी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागण्यात आलं आहे.

    मुख्यमंत्र्यांचा फोन उचलत नसल्याबद्दल प्रशासनाने २५ डीएम, चार कमिश्नर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असून त्यांना तीन दिवसात उत्तर देण्यास सांगितलं आहे. वाराणसी, प्रयागराज, अयोध्या आणि बरेलीच्या कमिश्नरला या नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी आणि कमिश्नर सरकारी फोन उचलत नसल्याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे वारंवार येत होत्या. त्यामुळे अखेर प्रशासनानेही ही अॅक्शन घेतली आहे.

    मुख्यमंत्र्यांनी स्वत: खात्री केली

    जिल्हाधिकारी आणि कमिश्नर फोन उचलत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आपल्यासमोरच सर्वांना फोन लावण्यास सांगितलं. त्यातील अनेकांनी फोनच उचलला नाही. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची खात्री पटली आणि त्यांनी संबंधितांना नोटीस पाठवण्याचे आदेश जारी केले.