कृषि क्षेत्राशी संबंधित विधेयकावरून राज्यसभेत प्रचंड गदारोळ

काँग्रेससह (Congress) विरोधी पक्षातील खासदार आक्रमक झाले आहेत. तसेच शेतकऱ्यांना प्रस्तावित कायदे त्यांच्या आत्म्यावर हल्ला केल्यासारखी वाटत आहे. त्यामुळे आम्ही या मृत्यूच्या वॉरंटवर स्वाक्षरी करणार नाही, अशी भूमिका घेत सरकारवर टीका केली. यावेळी तृणमूलच्या खासदारांनी सभापतीच्या समोरील हौद्यात उतरून नियमावली पुस्तिका फाडली.

तीन कृषि क्षेत्राशी संबंधित मोदी सरकारच्या (Modi Government) दोन विधेयकावरून राज्यसभेत (Rajya Sabha) प्रचंड गदारोळ सुरू आहे. सरकारच्या दोन्ही विधेयकांना मंजुरी देण्यास विरोधकांनी तीव्र विरोध केला आहे. काँग्रेससह (Congress) विरोधी पक्षातील खासदार आक्रमक झाले आहेत. तसेच शेतकऱ्यांना प्रस्तावित कायदे त्यांच्या आत्म्यावर हल्ला केल्यासारखी वाटत आहे. त्यामुळे आम्ही या मृत्यूच्या वॉरंटवर स्वाक्षरी करणार नाही, अशी भूमिका घेत सरकारवर टीका केली. यावेळी तृणमूलच्या खासदारांनी सभापतीच्या समोरील हौद्यात उतरून नियमावली पुस्तिका फाडली.

शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य, शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी ही दोन विधेयक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी राज्यसभेत मांडली. हे दोन्ही कायदे ऐतिहासिक असून, शेतकऱ्यांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवून आणतील. शेतकरी त्यांचा शेतमाल देशभरात कुठेही मुक्तपणे विकू शकतील. मी शेतकऱ्यांना आश्वासित करतो की ही विधेयके एमएसपीशी संबधित नाहीत, असं तोमर यांनी विधेयक मांडताना सांगितलं.

काँग्रेसचा या विधेयकांना विरोध आहे. पंजाब, हरयाणातील शेतकऱ्यांची अशी भावना आहे की, ही विधेयक त्यांच्या आत्म्यावर हल्ला आहे. या विधेयकांना सहमती देणं म्हणजे शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या वॉरंटवर स्वाक्षरी करण्यासारख आहे. शेतकरी एपीएमसी आणि एमएसपीतील बदलांच्या विरोधात आहे, असं काँग्रेसचे खासदार प्रताप सिंह बाजवा यांनी सभागृहात सांगितले आहे.