रात्री ११.३० वाजता केलं अपहरण, ३ वेगवेगळ्या गावी नेऊन ७ जणांनी १९ वर्षाच्या मुलीवर केला गँगरेप

पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर जबाब नोंदविला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सांगिलं की, १९ वर्षीय मुलीच्या भावाने ५ जुलै रोजी बहीण बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. ४ जुलैच्या रात्री साधारण ११.३० वाजता तिची बहीण घराबाहेर गाय बांधण्यासाठी गेली होती.

    अलवर : राजस्थानमधील (Rajasthan) अलवर जिल्ह्यातून पुन्हा एकदा बलात्काराची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. महिला सुरक्षा, महिला सबलीकरणाच्या बढाया मारणाऱ्या आपल्या देशात दिवसेंदिवस बलात्कार आणि महिला अत्याचाराच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. अलवर येथील गावातील एका १९ वर्षाच्या मुलीचं अपहरण (Kidnapping) करून ७ जणांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार (gang rape) केला. या कृत्यानंतर नराधमांनी मुलीला रस्त्याच्या किनाऱ्यावर फेकलं आणि फरार झाले. पोलिसांनी या प्रकरणात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

    पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर जबाब नोंदविला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सांगिलं की, १९ वर्षीय मुलीच्या भावाने ५ जुलै रोजी बहीण बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. ४ जुलैच्या रात्री साधारण ११.३० वाजता तिची बहीण घराबाहेर गाय बांधण्यासाठी गेली होती. तेथे अली मोहम्मद, सद्दाम आणि साजिद बसून दारू पित होते. यादरम्यान या तिघांनी मुलीचं तोंड दाबून तिला पळवून नेलं. सुरुवातील तिला ताहिरच्या घरी नेण्यात आलं. तेथे तिघांनी तिच्यावर बलात्कार केला.

    यानंतर तिघांनी पीडितेला गाडीत टाकून सांखला गावी घेऊन गेले. तेथे ताहिरचे मित्र उमरदीन आणि मरमेज या दोघांनी पीडितेवर बलात्कार केला. यानंतर आरोपींनी १९ वर्षांच्या पीडितेला दिवाकरी गावात घेऊन गेले. येथे कुम्हार आणि अरबान यांनीही तिच्यावर बलात्कार केला. यानंतर रात्री उशिरा पीडितेला त्यांना विट भट्टीजवळ सोडून पळ काढला.

    घरी परतल्यानंतर पीडितेने कुटुंबीयांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात जाऊन तरुणीचं अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून तपास सुरू केला आहे.

    humans or beasts kidnaped and gangrape of 19 year old girl by 7 people in 3 different villages