दोन बायकांमुळे नवरा त्रस्त, सासूबाईनं शोधला अजब उपाय अन् गावभर होतेय चर्चा

सासूच्या या कृत्यामुळे वैतागलेल्या दोन्ही बायकांनी मदतीसाठी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. बायकांची तक्रार ऐकल्यानंतर पोलीसही हैराण झाले आहेत. यानंतर पोलिसांनी पती आणि सासूला पोलीस ठाण्यात बोलवून समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

    रामपूर : एका सामन्य कुटुंबातील मुलानं दोन लग्न (2 Marriages) केल्यास काय होऊ शकतं याचा प्रत्यय नुकताचं एका घटनेमुळे आला आहे. नवऱ्यावरून दोन बायकांमध्ये सतत होणारा वाद थांबण्यासाठी सासूबाईला (Mother in law) आपल्या मुलाच्या दोन बायकांच्या (two wife) मध्ये जाऊन झोपायची वेळ आली आहे. पण सासूच्या या कृत्यामुळे वैतागलेल्या दोन्ही बायकांनी मदतीसाठी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. बायकांची तक्रार ऐकल्यानंतर पोलीसही हैराण झाले आहेत. यानंतर पोलिसांनी पती आणि सासूला पोलीस ठाण्यात बोलवून समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तसेच दोन्ही बायकांच्या मध्ये सासूबाईनं टाकलेला खाट बाजूला काढण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

    संबंधित घटना अझीमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टांडा या गावातील आहे. येथील युवक फिरासत अली यानं दोन लग्न केली आहेत. ही दोन लग्नच या विचित्र घटनेची मूळ कारण आहे. खरंतर, टांडा येथील रहिवासी असणाऱ्या फिरासत यानं आठ वर्षांपूर्वी गावातील नसरीन नावाच्या तरुणीशी विवाह केला होता. लग्नाच्या चार वर्षानंतर फिरासत याचं गावातील अन्य एक तरुणी शारिकासोबत प्रेमसंबंध जुळले. काही दिवसानंतर फिरासतनं शारिकासोबत न्यायालयात जाऊन विवाह केला.

    दरम्यान पहिल्या पत्नीला ही बाब कळल्यानंतर तिने बराच वादंग केला. पण गावकऱ्यांनी त्यांच्यात समजूत घालून प्रकरण मिटवलं. यानंतर दोघी एकत्र नांदू लागल्या. पण कालातरानं या दोघींमध्ये सतत खटके उडू लागले. काही वेळा दोघांनी एकमेकींना मारहाण देखील केली आहे. दोन्ही पत्नीला समजावून सांगण्यासाठी पती भांडणात आल्यानंतर बायकांनी त्यालाही धुतलं आहे. घरातील वाढता वाद लक्षात घेत, सासूबाईंनी दोन्ही पत्नींना नवऱ्याला भेटण्यास मज्जाव केला.

    तसेच स्वतःची खाट दोन्ही बायकांच्या मध्ये आणून लावली. सासूबाईच्या या कृत्यामुळे काही दिवसातच दोन्ही बायका वैतागल्या. शेवटचा पर्याय म्हणून दोघींनी अझीमनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. याठिकाणी पोलिसांनी सर्वांना एकत्र बसवून त्यांची समजूत घातली आहे. तसेच गावच्या पंचायतीनं दोन्ही बायकांच्या मध्ये लावलेली सासूबाईंची खाट काढायला लावली आहे. तसेच त्या ठिकाणी नवऱ्याची खाट लावण्यात यावी, असा आदेश दिला आहे. तसेच पतीनं दोन्ही पत्नींना एकसमान हक्क द्यावा, असंही पंचायतीनं सांगितलं आहे. यानंतर हा वाद मिटला आहे.

    Husband suffers due to two wives mother in law finds strange solution