राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar)यांना आयकर विभागाने (Income Tax Department)नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये त्यांना निवडणूक पत्राबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे.याबाबत पत्रकार परिषदेत शरद पवारांनी स्वतः माहिती दिली. ते म्हणाले, “आयकर विभागाकडून आधी मला नोटीस आली आणि आता सुप्रियाला येणार आहे असं कळलं आहे. ही चांगली गोष्ट आहे.कारण संपूर्ण देशातील इतर सदस्यांपैकी आमच्याबद्दल विशेष प्रेमाची भावना आहे याचा आनंद वाटतो, नोटीसमध्ये २००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत स्पष्टीकरण मागवलं असून ही नोटीस निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) सांगण्यावरुन आले असल्याचे पवारांनी सांगितले. नोटीसला उत्तर दिलं नाही तर दिवसाला १० हजारांचा दंड लागणार आहे त्यामुळे या नोटिसचे उत्तर लवकरच देणार असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितलं.

शरद पवारांचा अन्नत्याग
संसदेत कृषी विधेयकांवरील चर्चा सुरु असताना गोंधळ घातल्याने निलंबित करण्यात आलेल्या सदस्यांनी अन्नत्याग केला आहे. त्यांना समर्थन म्हणून शरद पवार यांनीही अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.शरद पवारांनी यावेळी राज्यसभा उपसभापतींवर नाराजी दर्शवित उपासभापतींनी सदस्यांना मत मांडायची संधी द्यायला हवी होती असे मत व्यक्त केले तसेच सभागृहात दोन ते तीन दिवस चर्चा होण्याची अपेक्षा असते. विधेयकांबाबत सदस्यांना प्रश्न होते, चर्चा करण्याचा आग्रह होता. पण ही सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेनुसार ही विधेयकं तातडीने मंजूर करण्यात आली , अशी टीका शरद पवार यांनी केली.